Saturday, December 21, 2024

काही तासांतच बदली रद्द: नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांची दुपारी बदली अन् रात्री रद्द

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- येथील महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांची बदली 30 ऑगस्ट रोजी परभणी महानगरपालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली होती. परंतु रात्री उशिरा त्यांच्या बदलीचा आदेश रद्द करण्यात आला असून पुढील आदेशापर्यंत त्यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिकेच्याअतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या बदलीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संबंधित बातमी 👇🏻

मागील दोन वर्षापासून नांदेड- वाघाळा शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉ. सुनील लहाने यांनी चांगले काम केले. विशेष म्हणजे कोरोना काळात तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या खांद्याला खांदा लावून कोरोनावर मात करण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले होते. शहरातील काही महत्त्वाच्या रस्त्यांचे कामही त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले होते.

परंतु काल अचानक त्यांची परभणी महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. बदलीनंतर काही तासांतच त्यांच्या या बदलीवर सरकारने स्थगिती दिली आहे. पुढील आदेशापर्यंत ते नांदेड- वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त पदी कायम राहणार आहेत, असे आदेश जारी करण्यात आले आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!