Sunday, December 22, 2024

खळबळ: नांदेडमध्ये शासकीय विश्रामगृहामागील विहिरीत आढळला मृतदेह

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- शहराच्या सह्याद्री शासकीय विश्रामगृहासमोर असलेल्या देवगिरी विश्रामगृहाच्या पाठीमागे असलेल्या एका विहिरीमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आज बुधवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. मोठी कसरत करत अग्निशामन दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढला आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या देवगिरी विश्रामगृहाला लागूनच एका विहिरीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. ही माहिती महानगरपालिकेच्या पथकांना मिळाल्याने अग्निशमन दलाचे अधिकारी रईस पाशा व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रोपवेद्वारे मृतदेह बाहेर काढला असून उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे पाठविण्यात आला आहे. नेमका मृतदेह कोणाचा आहे हे अद्याप ओळख पटली नसल्याचे सांगण्यात आले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!