Sunday, December 22, 2024

गावठी पिस्टल घेऊन फिरणाऱ्या एकास अटक; वजिराबाद पोलिसांची कारवाई

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– जिल्ह्यामध्ये गणेशउत्सव सण हा मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. अशातच गावठी पिस्तूल घेऊन परिसरात दहशत पसरविणाऱ्या दिलीपसिंग कॉलनी येथील एकास वजिराबाद पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शनिवार दि. 3 सप्टेंबर रोजी जेरबंद केले. त्याच्याविरुद्ध वजिराबाद पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

सध्या शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यातच आजपासून गौरी उत्सवालाही सुरुवात होत आहे. त्यामुळे महिला वर्ग बाजारपेठमध्ये खरेदी- विक्रीच्या तयारीला लागल्या आहेत. यातच वजिराबाद परिसरात पिस्तूल घेऊन दहशत पसरणारा युवक वजिराबाद पोलिसांच्या तावडीत अडकला.

गणेश उत्सवाच्या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडु नये त्याकरीता पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक विजय कबाडे, निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक ( शहर ) चंद्रसेन देशमुख यांनी सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी यांना पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगाराच्या याद्या अद्यावत करुन त्यांचेविरुध्द कडक प्रतिबंधक कार्यवाही करणे, अवैध धंद्याविरुध्द केसेस करणेबाबत सुचना देऊन गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत.

सदर सुचनांचे अनुषंगाने पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार व पो.नि. दत्तात्रय निकम यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सक्त आदेश देऊन ठाणे हद्दीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही याकरीता परिणामकारक गस्त करण्याबाबत आदेशीत केले.

दिनांक 2 सप्टेंबर रोजी गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार, पोना गजानन किडे, मनोज परदेशी, शरदचंद्र चावरे, विजयकुमार नंदे, पोकॉ संतोष बेलुरोड, शेख ईम्रान, रमेश सुर्यवंशी, व्यंकट गंगुलवार, बालाजी कदम यांनी पोलीस ठाणे हद्दीमध्ये गस्त करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, हरीष प्रकाश भगत रा. दिलीपसिंघ कॉलनी नांदेड या व्यक्तीकडे एक गावठी पिस्टल असून तो सध्या गोवर्धनघटजवळ असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यावरुन जेतवन बौध्द विहार गोवर्धनघाट या ठिकाणी छापा मारुन हरीष प्रकाश भगत यास पकडुन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी लोखंडी गावठी पिस्तूल (अग्नीशस्त्र) मिळुन आले. पोलिसांनी हे पिस्तुल जप्त करुन त्यास ताब्यात घेतले आहे.

सदर प्रकरणी आरोपीने विनापरवाना बेकायदेशिररित्या गावठी शस्त्र बाळगले प्रकरणी संजय डी. निलपत्रेवार यांनी  वजिराबाद ठाण्यात सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन शस्त्र अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास फौजदार प्रविण आगलावे करत आहेत. पोलीस ठाणे वजिराबाद येथील गुन्हे शोध पथकाच्या अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या कार्यवाहीबाबत वरिष्ठांनी त्यांचे कौतुक केले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!