Saturday, December 21, 2024

टरबुजाचा मळा पाहुन परतणाऱ्या तीन व्यापाऱ्यांना अँब्युलन्सने उडविले; दोन ठार एक गंभीर जखमी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

हिमायतनगर (जि.नांदेड)- येथील शिवारातील टरबुज मळा पाहुन मोटारसायकलवर परत हदगांव शहराकडे निघालेल्या तीन व्यापाऱ्यांना भरधाव वेगात जाणाऱ्या अँब्युलन्सने जोरदार धडक देवुन उडविले. यात दोन व्यापारी जागीच ठार झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे.

हा दुर्दैवी आपघात हिमायतनगर तालुक्यातील सरसम बु. या गावाजवळ घडला आहे. हे तीन व्यापारी हदगाव शहरातील एकाच प्रभागातील रहिवासी आहेत. शहरातील आयुब शेख युसुफ, सुभान शेख इस्माईल व अलीम  शे.बिलाल हे मोटार सायकलवरुन हिमायतनगर तालुक्यात टरबुज मळा पाहण्यासाठी आपल्या दुचाकीवरून आले होते. मळा पाहणी करून हदगाव शहराकडे निघाले असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या अँब्युलन्सने त्यांच्या दुचाकीला उडविले. त्यामुळे दुचाकीवरून उडून पडल्यामुळे दोघांचा मृत्य झाला. तर आलिम शे.बिलाल हा गंभीररित्या जखमी झाला असुन, त्यांची प्रकृति चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.

या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना कळविली असता पोलिसांनी दुसरी अम्ब्युलन्स बोलावुन जखमींना उपचारासाठी नांदेडला पाठविले. या अपघात प्रकरणी अँब्युलन्स ड्रायव्हर विरोधात पोलीसांनी हिमायतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केला करण्यात आला आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!