Sunday, December 22, 2024

दुर्गम किनवट येथेही आता उपलब्ध होणार ‘सिटी स्कॅन’ सुविधा; जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेअंतर्गत ३.१० कोटी रुपये झाले उपलब्ध

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

▪️पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा पुढाकार; किनवट उपजिल्हा रुग्णालयातील ‘सिटी स्कॅन’साठी ३.१० कोटी उपलब्ध

नांदेड– पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकारातून किनवट येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी सिटी स्कॅन मशीन खरेदी करण्याकरिता ३ कोटी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेअंतर्गत ही तरतूद करण्यात आली असून, जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव डॉ. विपीन इटनकर यांनी प्रशासकीय मान्यता व निधी वितरणाचे आदेश निर्गमीत केले आहेत.
 
नांदेड जिल्ह्यातील किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर हे तालुके आदिवासी बहुल आहेत. किनवटपासून नांदेडचे अंतर सुमारे १५० किलोमीटर असल्याने आपत्कालीन प्रसंगी या तालुक्यांमधील रुग्णांना योग्य निदान व उपचाराच्या सुविधेसाठी नांदेड किंवा आदिलाबादला धाव घेण्याशिवाय पर्याय नव्हता. या परिसरातील रुग्णांची ही अडचण लक्षात घेऊन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी किनवट येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील सेवा-सुविधा भक्कम करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले होते. यानुसार किनवट येथे उपलब्ध असलेल्या ट्रामा केअरच्या कुशल मनुष्यबळाला आता सिटी स्कॅनची जोड मिळणार असून, गंभीर दुखापत झालेल्या तसेच आजारी रुग्णांच्या तात्काळ अचूक निदानासाठी हे सिटी स्कॅन मशीन महत्वाचे ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला आहे.
 
किनवट तालुक्यात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया आधुनिक यंत्रसामुग्रीने करता याव्यात, यादृष्टीने किनवट उपजिल्हा रुग्णालयात फेको मशीन उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामुळे गरजूंना विनाटाका मोतीबिंदू शस्त्रक्रिया करता येणे शक्य झाले आहे. या मशीनचा लाभ शेजारच्या तालुक्यातील नागरिकांनाही होत असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शिरसीकर यांनी दिली. या उपजिल्हा रुग्णालयात दिवसाला तीनशे ते चारशे रुग्ण प्रथमोपचारासाठी येतात. महिन्याला 70 ते 80 महिलांचे बाळंतपण या ठिकाणी केले जाते. या रूग्णालयात ५० खाटांची मान्यता आहे.  

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!