ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– औरंगाबाद येथील जाहेद उर्फ लंगडा याच्या टोळीसाठी काम करणाऱ्या नांदेड, औरंगाबाद, पुणे आणि मुंबई शहरात दहशत पसरवणार्या नांदेडच्या दोघांविरुद्ध पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली. या दोघांसह पुणे येथील काही अट्टल गुन्हेगारांचा यात समावेश आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारांविरुद्ध कठोर भूमिका घेत मोक्का कायद्यांतर्गत कारवाई सुरू केली आहे, त्यात या कारवाईचाही समावेश आहे.
नांदेड शहराच्या हिंगोली नाका परिसरात असलेल्या सैलानीनगरमध्ये राहणारा अजय राजकुमार ढगे (वय 22 वर्षे, रा. हिंगोली नाका परिसर, नांदेड) आणि त्याचा मित्र अझहर रहिमोउद्दीन शेख उर्फ बांगा (वय २६ वर्षे, रा.सादतनगर, नांदेड) हे दोघेजण औरंगाबाद, गारखेडा परिसरात राहणारा सराईत गुन्हेगार जाहेद उर्फ लंगडा याच्या टोळीसाठी काम करत होते. हे दोघेही मागील काही दिवसांपासून पुणे पोलिसांच्या अटकेत आहेत. पुणे शहरात कोंडवा, काळेवाडी यासह विविध भागात तसेच औरंगाबाद, नांदेड अशा जिल्ह्यामध्ये दहशत पसरून संघटित गुन्हेगारी करत होते. यांच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या गुन्हेगारांबाबत अत्यंत कठोर भूमिका घेत या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पुढील तपासासाठी या दोघांनाही घेऊन पुणे पोलीस नांदेडला येणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻