ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
![](http://godateer.com/wp-content/uploads/2021/12/png-transparent-logo-whatsapp-watercolor-splash.png)
◆ भिक्षा मागण्याच्या कारणावरून मारहाण; रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
नांदेड– समाजातुन वंचित असलेल्या व भिक्षा मागून आपली उपजीविका भागविणाऱ्या खऱ्या दोन तृतीयपंथीयांना चार तोतया तृतीयपंथीयांनी संगणमत करून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
आमच्या भागात येऊन भिक्षा का मागता? असे म्हणून ही मारहाण करण्यात आली. यात खऱ्या तृतीयपंथीयांचे हात फ्रॅक्चर झाले आहेत. या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात चार तोतया तृतीयपंथीयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ते चारही तोतया तृतीयपंथी फरार झाले आहेत.
रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत जिगळा या. नायगाव परिसरात 24 जानेवारीच्या रोजी चार तोतया तृतीयपंथीयांनी संगनमत करून, आमच्या भागामध्ये भिक्षा मागण्यासाठी का आलात म्हणून खऱ्या दोन तृतीयपंथीयांसोबत वाद घातला. एवढेच नाही तर त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. काठीने हातापायावर मारण्यात आल्यामुळे मनीषा गौरी बकस आणि राधा गौरी बकस या दोन तृतीयपंथीयांच्या हातांचे हाड यात फॅक्चर झाले असून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. पुन्हा आमच्या भागात आलात तर जीवे मारण्याची धमकीही त्यांना देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मनीषा बकस हिच्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात फरिदा उर्फ फय्याज बेग, गीता पायल ठाकरे उर्फ सुरे, सलीम बेग उर्फ सलमा, मुदसीर बागवान उर्फ फिदा सर्व राहणार जिगळा, तालुका नायगाव यांच्याविरुद्ध गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस अंमलदार आडे करत आहेत.
याप्रकरणी तृतीयपंथीयांचे प्रमुख गौरी देवकरने सांगितले की, आमच्या दोन्ही तृतीयपंथीयांना जबर दुखापत झाली असतानाही आरोपींवर कारवाई होत नाही. लवकरच याप्रकरणी आमचे शिष्टमंडळ पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार असून घडलेला सर्व प्रकार त्यांच्या कानावर टाकणार असल्याचे गौरीने सांगितले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
![](http://godateer.com/wp-content/uploads/2021/12/png-transparent-logo-whatsapp-watercolor-splash.png)