Friday, January 3, 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अचानक नांदेडमध्ये! भारतीय वायुसेनेच्या विशेष हेलिकॉप्टरने नांदेड विमानतळावर आगमन

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻


🟠 मान्यवरांनी केले स्वागत, पंतप्रधान नांदेडहून रामेश्वरमकडे रवाना

नांदेड – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सोमवारी अचानक नांदेडमध्ये आगमन झाले. भारतीय वायुसेनेच्या विशेष हेलिकॉप्टरने ते नांदेड विमानतळावर आले. यावेळी विमानतळावर मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान नांदेडहून रामेश्वरमकडे रवाना झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेलंगणा येथील भारतीय जनता पक्षाच्या सभेला संबोधण्यासाठी आदिलाबाद येथे सोमवार दि. चार मार्च रोजी आले होते. त्यानंतर वायुदलाच्या हेलिकॉप्टरने नांदेड येथील श्री गुरु गोविंदसिंग विमानतळावर त्यांचे दुपारी दोन वाजून दहा मिनिटाला आगमन झाले. त्यानंतर रामेश्वरमकडे भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने दोन वाजून पंधरा मिनिटाला ते रवाना झाले.

नांदेड विमानतळावर आल्यानंतर खासदार अशोकराव चव्हाण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, खासदार डॉक्टर अजित गोपछडे, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार डॉक्टर तुषार राठोड, आमदार बालाजीराव कल्याणकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, महिला आघाडीच्या प्रणिताताई देवरे- चिखलीकर, डॉ. मीनल पाटील खतगावकर, वैशाली देशमुख आदींनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ४ मार्च रोजी अचानक दौरा निश्चित झाल्याने सकाळपासूनच पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आयटीआय ते विमानतळपर्यंत मुख्य रस्त्यावरील अंतर्गत रस्त्यावर लाकडी बॅरिकेट उभारण्यात आले होते. तर विमानतळ परिसरातील बराच भाग व दुकाने पोलिसांनी बंद ठेवली होती, तसेच आज असणारा सांगवीचा आठवडी बाजारही बंद ठेवण्यात आला.

विमानतळ व विमानतळ परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. विमानतळाच्या अंतर्गत बंदोबस्तासाठी सीआरपीएफ तर बाहेरील भागात एसआरपीएफ आणि नांदेड पोलीस तैनात करण्यात आले होते. कालपासूनच पोलीस प्रशासनाने तयारी सुरू केली होती. काल रविवारी रंगीत तालीमही करण्यात आली.

काही दिवसांपूर्वीच यवतमाळ येथे होणाऱ्या महिला मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नांदेडमार्गेच जाणार होते. परंतू ऐनवेळी ते नांदेड ऐवजी नागपूर विमानतळावर उतरुन तिथून हेलिकॉप्टरने यवतमाळला गेले होते. त्यावेळीही नांदेडमध्ये पोलीस प्रशासनाने चोख तयारी केली होती.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!