ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
१५ ते १८ वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु होणार
नवी दिल्ली– पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशाला संबोधित करताना लसीकरण आणि बूस्टर डोस संबधी महत्त्वाची घोषणा केली. यावेळी त्यांनी १५ ते १८ वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु होणार असल्याची मोठी घोषणा केली.
हे लसीकरण नव्या वर्षात ३ जानेवारीपासून सुरु होणार आहे. तसंच आरोग्य कर्मचारी अर्थात हेल्थ केअर आणि फ्रंटलाईन वर्कर्सना दोन लसीकरणांनंतर बूस्टर डोसही देण्याची सुरुवात करण्यात येणार असल्याचे मोदी यांनी सांगितलं. याची सुरुवात १० जानेवारीपासून होणार आहे. याशिवाय ६० वर्षांवरील नागरिकांनाही डॉक्टरांच्या सल्ल्याने बूस्टर डोस देण्याची सुरुवात करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻