Sunday, December 22, 2024

प्रा. डॉ. जगदीश कदम यांना यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार प्रदान

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार नांदेड येथील ज्येष्ठ साहित्यिक जगदीश कदम यांना साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. कदम यांनी आतापर्यंत केलेल्या साहित्य सेवेबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. पाच हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल, पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

येथील यशवंतराव चव्हाण विचार मंचाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी केले. काही कौटुंबिक अडचणीमुळे अंबाजोगाई येथील स्मृती महोत्सवात कदम सहभागी होऊ शकले नाहीत. त्यामुळे अशा अपवादात्मक परिस्थितीत गौरव करण्यात येणाऱ्या साहित्यिकाचा पुरस्कार पोस्टाने अथवा हस्तेपरहस्ते न पाठवता त्यांना प्रत्यक्ष प्रदान करण्यात स्मृती समितीला अधिक आनंद वाटतो असे ते म्हणाले. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मँनेजर दिनेश कराड यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना जगदीश कदम यांनी ग्रामीण भागातील मोडलेल्या माणसाला उभे करण्याचे श्रेय यशवंतरावजींकडे जाते असे सांगितले. या पुरस्काराने आपली जबाबदारी वाढली असून कसल्याही प्रकारची तडजोड न करता कष्टकरी,शेतकऱ्यांचे दैन्य,दु:ख आपण साहित्यातून  प्रामाणिकफणे मांडण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. देशमुख यांनी कदम यांच्या लेखनातून भरडले गेलेल्या माणसाचे जगणे आलेले आहे असे सांगून त्यांचा ‘मुडदे’ हा कथासंग्रह प्रभावीत करणारा होता असे सांगितले. एका भूमिकानिष्ठ लेखकाचा हा गौरव आहे,असे ते म्हणाले. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याची थोरवी विविध दाखले देत त्यांनी मांडली.

रापतवार यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवीकट्टाचे संयोजक अशोक कुबडे यांनी केले तर आभार प्रदर्शन यशवंतराव चव्हाण विचारमंचचे अध्यक्ष प्रा.नारायण शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाला निर्मलकुमार सूर्यवंशी, दत्ता डांगे, संजय सूरनर, डॉ़. व्यंकटी पावडे, दिगंबर कदम, श्रीनिवास मस्के, आनंद पुपुलवाड, भास्कर शिंदे, डॉ.शंकर विभुते, साईनाथ रहाटकर, भास्कर शिंदे, प्रा.देवसरकर, राऊतखेडकर आदी साहित्यिक आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण विचारमंचचे अध्यक्ष  प्रा.नारायण शिंदे यांनी आभार मानले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!