Friday, December 27, 2024

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नवे निर्बंध लागू

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

● लग्न समारंभासाठी फक्त ५० लोकांच्या उपस्थितीला परवानगी

● तर अंत्यविधीसाठी २० लोकांनाच उपस्थित राहता येणार

मुंबई- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे. गुरुवारी राज्यात साडे पाच हजाराच्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत. काल गुरुवारी रात्री याबाबतचे आदेश काढण्यात आले.

राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्याही साडे चारशेच्या पुढे गेली आहे. त्यातच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून काल ३० डिसेंबरला रात्री उशिरा नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.

राज्य सरकारनं जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून राज्यात नवे निर्बंध लागू असणार आहेत. राज्यातील कोरोनाचा वाढता फैलाव पाहता राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी संध्याकाळी दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्बंधांबाबत अंतिम निर्णय घेतील, असं सांगतानाच हे निर्बंध आज-उद्या लागू होतील, असंही ते म्हणाले होते. त्यानुसार गुरुवारी रात्री उशिरा राज्य सरकारकडून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

नवे निर्बंध-

१. बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागेतील लग्न संमारंभासाठी फक्त 50 लोकांच्या उपस्थितीला परवानगी

२. सर्व प्रकारचे सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी मग ते बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागी असतील, अशा कार्यक्रमांना ५० लोकांच्या उपस्थितीची परवानगी

३. अंत्यविधीसाठी 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी

४. पर्यटन स्थळे, समुद्र किनारे, रिकामी मैदाने आदी ठिकाणी कलम 144 लागू

५. परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा

६. यापूर्वी राज्य सरकारकडून घालण्यात आलेले अन्य निर्बंध कायम राहतील.

३१ डिसेंबरच्या अनुषंगाने आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळावी, संसर्ग होईल असं कुठलंही कार्य करू नका. कोरोना नियमावलीचं पालन करा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना केले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!