Friday, December 27, 2024

शस्त्रास्त्रांसह दरोडा टाकण्याच्या तयारीत होती टोळी; पोलिसांनी मुसक्या आवळत दोन पिस्तुलं, एक रायफल आणि १७ जिवंत काडतुसं केली जप्त

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई 

नांदेड– शहरातील  नांदेड ग्रामीण हद्दीतील ग्रामीण तंत्रनिकेतन कॉलेज ते असदवन- वाघाळा जाणाऱ्या रोडच्या बाजुस थांबुन रस्त्याने येणारे- जाणारे प्रवाशांना लुटण्यांचे इराद्याने अंधारात दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, एक बारा बोरची बंदूक आणि सतरा जिवंत काडतुसं यासह इतरही घातक शस्त्र जप्त करण्यात आले आहेत.

ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाल्याने त्यांनी पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी (इतवारा) डॉ. सिध्देश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड व त्यांच्या पथकाने ग्रामीण तंत्रनिकेतन कॉलेज ते असदवन वाघाळा जाणारे रस्त्याचे बाजुस गुरूकुल इंग्लिश स्कुल असे लिहिलेल्या पाटीजवळ दि.11 मार्च पहाटे एक वाजता नमुद ठिकाणी जावुन सापळा रचला. आणि याठिकाणी दबा धरून बसलेल्या  इसमांकडे जात असताना एकास पोलिसांनी पकडले. हे पाहून दबा धरून बसलेले इतर आणि सहा दरोडेखोर अंधाराचा फायदा घेवुन पळण्याचा प्रयत्न केला. पण त्यापैकी चार जणांना पोलिसांनी शिताफीने पकडले. हे सर्व जण सराईत आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार निघाले आहेत. त्यांना ताब्यात घेवुन पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता ते सर्वजण, रस्त्यावरुन येणाऱ्या-जाणाऱ्या वाटसरूंना अडवून त्यांना लुटण्यासाठी दबा धरून बसले असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे कमलेश उर्फ अशु पाटील बालाजी लिंबापुरे (वय 22 रा. गॅस गोडावून जवळ वसरणी नांदेड), आकाश जिवनसिंग ठाकुर (वय 29 रा. बसवेश्वरनगर कौठा नांदेड) तेजपालसिंग ऊर्फ तेजा कुलवंतसिंग चहल (वय 30, रा. जुना कौठा नांदेड), देवीदास पिराजी माटे (वय 27 रा. भोई गल्ली, वसमत जि. हिंगोली ह. मु. अबचलनगर गोविंदबाग नांदेड) अशी त्यांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातुन एक सिल्वर कलरची लाकडी मुठ असलेली देशी बनावटीची पिस्टल (देसी कटटा) ज्याची किंमती अंदाजे 20 हजार रुपये, एक राखाडी रंगाची लाकडी मुठ असलेली देशी बनावटीची पिस्टल (देसी कटटा ) ज्याची किंमती अंदाजे 20 हजार, बारा बोअर बंदुक व जिवंत 17 काडतुसे, दोन धारदार व टोकदार अंदाजे 9 इंच लांब असलेले 1 खंजर, कागदी पुडीत लाल मिरची पावडर, MH-26-BL-1054 क्रमांकाची व बिना नंबरची अशा दोन मोटार सायकल, असा एकुण 1 लाख ४५ हजार रुपये किमतीचा माल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस स्टेशन गु.र.न. 163/2023 क.399,401,402 भादंवि सह क.3/25,4/25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास पोउपनि बालाजी नरवटे हे करत
आहेत. सदर तपासादरम्यान चारही आरोपीतांना न्यायलयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने सदर आरोपीतांची दिनांक १६ मार्चपर्यंत रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरीत आरोपीतांचा शोध पोलीस घेत आहे. सदर कामगिरी करणारे पोलीस निरीक्षक अशोक घारेबांड व त्यांच्या टीममधील पोउपनि डाकेवाड, पोउपनि कोरे,  पोउपनि बिच्चेवार पोहेका प्रमोद कऱ्हाळे, पोहेकॉ विक्रम वाकोडे, पोहेका प्रभाकर मलदोडे, पोहेकॉ संतोष जाधव, पोना कवठेकर, पोना बिरमवार, पोशि/चंद्रकांत स्वामी,  विश्वनाथ पवार,  संतोष बेलुरोड, पोका उमर शेख, पोकॉ कानगुले या सर्वांचे श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड व डॉ. सिद्धेश्वर भोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग ईतवारा यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!