ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड/ अहमदनगर- समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा आज भीषण अपघात झाला असून यात मूळ।नांदेडचे रहिवासी असणारे तीन जण ठार झाले आहेत. नांदेडहून मुंबईकडे जाणाऱ्या होंडाई वरना कारचा कोपरगावजवळ अपघात झाला असून यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. गाडी डिव्हायडरला धडकल्यामुळे हा अपघात झाला आहे. या अपघातात हुंडाई वरना गाडी क्रमांक MH-04-JV-2430 ह्या वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मृतांमध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.
मृतांची नाव मोहम्मद जावीद अख्तर मोहम्मद सलिमोद्दिन – वय ५५, अरकुमुद्दीन जावीद अख्तर वय २२, शामीमबेगम मोहम्मद जावीद अख्तर वय ३६ सर्व सध्या राहणार मुंब्रा मुंबई (मुळगाव नांदेड) हे बकरी ईदचा सण साजरा करून नांदेड वरून मुंबईकडे जात असतांना गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची सांगण्यात येत आहे.
या अपघातामध्ये गाडीचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, बुलढाणा बस अपघाताची घटना ताजी असतानाच आज पुन्हा समृद्धी महामार्गावर अपघात घडल्याने रस्ते अपघात आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻