ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नवीन नांदेड (रमेश ठाकूर): कौठा परिसर बांधण्यात आलेल्या महसुल विभागाच्या इमारतीतील अनेक सदनिका काही कुटुंबियांनी ताब्यात घेऊन तिथे आपले बस्तान मांडले होते. त्यामुळे तहसीलदार किरण अंबेकर यांनी महसुल विभागाच्या पथकासह पोलिसांच्या मदतीने त्या कुटूंबियांना दि. २१ फेब्रुवारी रोजी तिथून हटवून इमारती आणि सदनिका ताब्यात घेतल्या आहेत. पोलीस प्रशासनाचा साह्याने इमारती आणि सदनिका ताब्यात घेऊन इमारत प्रवेशद्वाराला कुलुप लावण्यात आले.
कौठा परिसरातील बॉम्ब शोधक व पथक कार्यालयाच्या समोरील बाजुला महसुल विभागाच्या टोलजंग इमारती उभारण्यात आलेल्या आहेत. यामध्ये पोलीस प्रशासन व महसुल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सदनिका उपलब्ध आहेत. परंतू सध्या एकाही कुटूंबाने या सदनिकेत प्रवेश केलेला नाही. काही दिवसांपुर्वी येथील सदनिकेच्या साहित्यांची नासधुस करुन काही साहित्य चोरुन नेल्याचा प्रकार पुढे आला.
संबंधित बातमी 👇
त्यानंतर अनेक कुटूंबानी काही दिवसांपुर्वी या सदनिका ताब्यात घेवून इथे संसार थाटला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या आदेशावरुन तहसीलदार किरण अंबेकर यांनी यापुर्वी संबंधितांना सदनिका रिकाम्या करण्याबाबत काही दिवसाची सवलत दिली होती. परंतू अतिक्रमीत कुटूंबांनी आम्हाला जोपर्यंत राहण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत जागा सोडणार नाही, असा पवित्रा घेतला होता.
अखेर तहसीलदार किरण अंबेकर, नायब तहसीलदार मुगाजी काकडे, मंडळ अधिकारी नागमवाड, तलाठी मनोज देवणे यांनी ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड व उपनिरीक्षक बी.के.नरवटे, भगवान गिते, शेख उमर, राजु हुमनाबादे, स्वामी, चौधरी, शंकर बिरमवार, सुनिल गटलेवार, कांबळे, झुंजारे, मांगुळवार, महिला पोलीस ज्योती कंधारे यांच्यासह महिला व पोलीस फौजफाट्याच्या मदतीने सदनिकेवर अतिक्रमण केलेल्या सर्वांना त्या ठिकाणाहून हटवून सदनिका रिकाम्या केल्या. त्यानंतर इमारत प्रवेशद्वाराला कुलुप लावण्यात आले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻