ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
हदगाव (जि. नांदेड)- नांदेड- नागपूर रोडवरील बरड शेवाळा येथे झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन जण ठार झाले आहेत. वडिलांनी पंढरपूरहून सोबत आणलेला प्रसाद वाटण्यासाठी हे तिघेही निघाले होते.
तालुक्यातील नांदेड- नागपूर रोडवरील बरड शेवाळा येथे झालेल्या अपघातामध्ये बामणी फाटा येथील संतोष कोंडबा टोपलेवार (वय 29), सुरेखा संतोष टोपलेवार (वय 25) सतीश मसाजी टोपलेवार (वय 25) सर्व राहणार बामणी आबादी (ता. हदगाव) हे ठार झाले आहेत. हे कुटुंब मोलमजुरी करून उपजीविका भागवणारे होते.
वडील कोंडबा टोपलेवार हे पंढरपूरहुन वारी करून परत आले होते. वडिलांनी पंढरपूरहून सोबत आणलेला प्रसाद घेऊन त्यांचा मुलगा संतोष, त्याची पत्नी व कुटुंबातील अन्य एकजण असे तिघेजण हदगाव येथील नातेवाईकांना हा प्रसाद देण्यासाठी दुचाकीवरून जात होते. त्यावेळी वाहनाच्या धडकेत हे दुचाकीवरील तिघेही ठार झाले.
आज शुक्रवार दि. १५ जूलै रोजी दुपारी चार वाजता घडलेल्या अपघाताची माहिती मनाठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांना भ्रमणध्वनीवरून समजताच ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मृत व्यक्तींना हदगाव उपजिल्हा रुग्णालय येथे उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले आहे. टोपलेवार कुटुंबावर काळाने घातलेल्या आघाताने कुटुंबातील तीन व्यक्ती एकाच वेळी मृत्युमुखी पडल्या आहेत. या घटनेमुळे बरडशेवाळा गावासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻