ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- शहराच्या श्रीनगर भागात हनुमान मंदिर परिसरात एका 23 वर्षे युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना मंगळवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी पहाटे अडीचच्या सुमारास घटना उघडकीस आली.
नांदेड शहराच्या श्रीनगर भागातील महारुद्र हनुमान मंदिर भागात राहणाऱ्या व नांदेडच्या पोलीस पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या राधेश्याम अग्रवाल (वय 23) या युवकाच्या पोटात चाकूने भोसकून खून करण्यात आला. खुनानंतर या युवकास एका इमारतीच्या गच्चीवरून खाली टाकून अपघात झाल्याचे भासवण्यात आले. परंतु वैद्यकीय अहवालानंतर त्याच्या पोटात चाकूने भोसकुन खून केल्याचे उघडकीस आले.
याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे व आदींनी या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. घटनास्थळाला फॉरेन्सिक टीमने भेट दिली असून सदर युवकाचा खून कोणी व का केला? याचा शोध भाग्यनगर पोलीस घेत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻