ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
अर्धापूर : शहरात अहिल्याबाई होळकर चौक व बसवेश्वर चौकात पिसाळलेल्या घोड्याने भररस्त्यात धुमाकूळ घालीत तीन जणांना चावा घेतल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार अर्धापूर शहरातील मुख्य रस्त्यावर व बाजारपेठेत आज सायंकाळच्या सुमारास घडला. या प्रकाराने परिसरातील नागरिक भयभीत झाल्याने बराच वेळ परिसरात गोंधळ उडाला होता.
अर्धापूर शहरातील नांदेड-नागपूर या मुख्य रस्त्यावर व परिसरात पिसाळलेल्या घोड्याने धुमाकूळ घालत तीन जणांना चावा घेतला. घोड्याने चावा घेतल्यामुळे धम्मपाल सरोदे, सुधाकर मोरे व आणखी एक जण जखमी झाले असून त्यांना नांदेड येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकाराने रस्त्यावर वाहतूक ठप्प होऊन वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. पिसाळलेल्या घोड्याला बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी या घोड्याने रस्त्यावरील काही वाहनांवरही जोरदार हल्ला चढवला. काही जणांनी या घोड्याला रोखण्यासाठी समोर येत घोड्यास सापळा रचून पकडले व बांधून ठेवले. त्यामुळे अर्धापूरकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
या घोड्याला पकडल्यानंतर नगरपंचायतींचे नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, चेअरमन प्रविण देशमुख, पोलीस निरीक्षक अशोक जाधव, जमादार भिमराव राठोड, आर.एम.जोशी, गुरूदास आरेवार, अतुल गोदरे आदींनी गावाच्या बाहेर गायरानात नेऊन सोडून दिले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻