ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
अर्धापूर- अर्धापूर नगरपंचायतीच्या पूर्वी ओबीसी प्रवर्गाकरिता आरक्षित असलेल्या जागा आता खुल्या झाल्या आहेत. या सर्वसाधारण प्रवर्गाच्या झालेल्या जागा सर्वसाधारण महिलांकरीता आरक्षित ठेवण्यात येत असुन या ४ जागांसाठीच्या सुधारीत आरक्षणाची सोडत गुरूवार, दि. २३ डिसेंबर रोजी होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार डिसेंबर २०२१ कालावधीत अर्धापूर नगरपंचायतीच्या ना.मा.प्र.(ओबीसी) करीता आरक्षित असलेल्या जागा सर्वसाधारण प्रवर्गाच्या झाल्या आहेत. अर्धापूरमधील या चार जागांसाठी सर्वसाधारण महिलांकरीता आरक्षित ठेवावयाच्या जागांसाठी सुधारीत आरक्षण सोडत होत आहे. दि.२३ गुरूवार रोजी अर्धापूर नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या ना.मा.प्र. व ना.मा.प्र. महिला आरक्षणाच्या ऐवजी सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठीच्या सोडतीचा कार्यक्रम, उपविभागीय अधिकारी विकास माने यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे. तहसीलदार उज्वला पांगरकर, मुख्याधिकारी शैलेश फडसे, नायब तहसीलदार मारोतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय अर्धापूर येथे गुरुवार दि.२३ डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता ही सोडत होणार आहे. अर्धापूर नगरपंचायत क्षेत्रातील सर्व नागरीकांनी आरक्षण निश्चितीच्या कार्यक्रमास सोडतीच्या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻