Thursday, November 21, 2024

आगीचा भडका उडाल्याने खासदार चिखलीकरांचा हात भाजला; नांदेडमध्ये भाजपच्या आंदोलनात प्रतिकात्मक पुतळा जाळताना घडला धक्कादायक प्रकार /👇🏻व्हिडिओ

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- भारतीय जनता पार्टीच्या वतीने नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा आगीने हात भाजल्याची घटना घडली आहे. पाकिस्तान आणि तेथील नेता बिलावल भुट्टो याच्याविरोधात आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या आंदोलनात बिलावल भुट्टो याचा प्रतिकात्मक पुतळा जाळताना ही घटना घडली.

भाजपच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते प्रतिकात्मक पुतळा पेटविण्यात येणार होता. त्यानुसार पेट्रोल टाकलेल्या प्रतिकात्मक पुतळ्यास खासदार चिखलीकर यांनी काडीने पेटवताच आगीचा अचानक भडका उडाला. या भडक्यामुळे खासदार चिखलीकर यांचा हात भाजला आहे. या प्रकारानंतर त्यांच्यावर तात्काळ प्राथमिक उपचार करण्यात आले असून हाताला किरकोळ जखम भाजल्याचे सांगण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध अपशब्द उच्चारणारा पाकिस्तानचा विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांच्या पुतळ्याला जोडे मारत पाकिस्तानचा ध्वज जाळून भाजपा नांदेड महानगरतर्फे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, संघटन मंत्री संजय कौडगे व महानगर जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली.

या प्रसंगी भाजपा प्रदेश कार्यालय सहमंत्री भरत राउत यांची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी दहा वाजल्यापासून वजीराबाद (हनुमान पेठ) येथील मुथा चौकात भाजपा सदस्यांनी गर्दी केली होती. भाजपाचे झेंडे घेतलेल्या तरुणांनी प्रचंड घोषणाबाजी करून सर्व परिसर दणाणून सोडला. अनेकांच्या हातात निषेधाचे फलक होते. सुरुवातीला अॅड. दिलीप ठाकूर यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी बोलताना, खा. चिखलीकर यांनी, देशाच्या सर्वोच्च व्यक्तीविरुद्ध अपशब्द बोलणाऱ्या विरुद्ध इतर पक्षाचे नेते मूग गिळून असल्याचा निषेध केला. प्रवीण साले यांनी पाकिस्तानच्या या आगळीकीचा जवाब देण्यात येईल असा इशारा दिला. याप्रसंगी प्रणिता देवरे चिखलीकर, व्यंकट मोकले, अनिलसिंह हजारी, सुशील कुमार चव्हाण, डॉ. सचिन पाटील उमरेकर, अकबरखान पठाण यांचे समायोजित भाषणे झाली. सूत्रसंचालन विजय गंभीरे तर आभार अशोक पाटील धनेगावकर यांनी मांडले. यानंतर बिलावल भुट्टोच्या पुतळ्याला महिलांनी चप्पला मारल्या. त्यानंतर खा. चिखलीकर यांच्या हस्ते भुट्टोचा पुतळा व पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला संतप्त तरुणांनी टायर जाळल्यामुळे बऱ्याच वेळ वाहतूक बंद झाली होती.

यावेळी भरत राऊत, बापू देशमुख, बाळू खोमणे, दीपकसिंह रावत, दिलीपसिंघ सोडी, शितल खांडील, दीपक कोठारी, शितल भालके, शततारका पांढरे, महादेवी मठपती, अभिलाष नाईक, केदार नांदेडकर, प्रेम कुमार फेरवानी, किशोर यादव, संतोष परळीकर, सुमित राठोड, दिगंबर लाभशेठवार, संजय घोगरे पाटील, सुनील भालेराव, बबलू यादव, अनिल पाटील बोरगावकर, चक्रधर कोकाटे, गजानन उबाळे, उमेश स्वामी, साहेबराव गायकवाड, शंकर मनाळकर, कामाजी सरोदे, बजरंग जोंधळे, कुणाल गजभारे, अंकुश पार्डीकर, राजाराम टोम्पे, सुमित सोनकांबळे, कृपालसिंघ हुजूरीया, जसबीरसिंघ धुपिया, अभिषेक सौदे, संतोष बेरुळकर, प्रेम जुनी, जनार्दन गुपिले, सागर डहाळे, सुरेश लोट, राज यादव, अक्षय आमिलकंठवार, उमेश सरोदे, संतोष गुजरे, नरेश आलमचंदानी, प्रज्ञा देशमुख, श्रद्धा चव्हाण, सुमन मामीलवाड, लक्ष्मी वाघमारे, अपर्णा मोकाटे, अनुराधा गिराम, सोनू उपाध्याय, बालाजी सूर्यवंशी, निलेश कुंटूरकर, लक्ष्मण यमलवाड, वेदांत पोफळे, अमोल कुलथीया, सागर जोशी, विशाल शुक्ला, अनिल लालवानी तसेच अनेक देशप्रेमी नागरिक व भाजपा कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!