ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- आठवडी बाजारातून मोबाईल चोरणाऱ्या झारखंड राज्यातील एका टोळीला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. पाच जणांची ही टोळी ट्रॅव्हल्सने पळून जाण्याच्या तयारीत असताना ट्रॅव्हल्स पॉईंटवरूनच पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांच्याकडून 4 लाखांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आठवडी बाजारातुन महागड्या मोबाईल चोरीचे प्रमाण वाढल्याने भाग्यनगर गुन्हे शोध पथकाला आरोपीतांचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणण्याबद्दल पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलीस निलेश मोरे, विजय कबाडे, पोलीस उपअधीक्षक अर्चना पाटील, चंद्रसेन देशमुख यांनी आदेशीत केले होते.
पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पथक प्रमुख सपोनि सुशांत किनगे व सोबत पोहेकॉ संजय कळके, प्रदिप गर्दनमारे, हनवता कदम, सुमेध पुंडगे अशा प्रकारे पथक तयार करून साध्या वेषात पो.स्टे. हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना पथकाला गुप्तबातमीदाराकडुन माहिती मिळाली की, झारखंड राज्यातुन 5 इसम नांदेड शहरात आलेले असुन ते आठवडी बाजार व गर्दीचे ठिकाणी जावुन लोकांचे खिशातील मोबाईल चोरी करीत असतात. असेच चोरीतील मोबाईल घेऊन ते सध्या नागपुरकडे ट्रॅव्हल्सने जाण्यासाठी हिंगोली गेट नांदेड येथे थांबलेले आहेत. खात्रीशीर माहीती मिळताच पोलीस लागलीच हिंगोली गेट नांदेड येथे पोहोचले, व नमुद झारखंड राज्यातील पाच इसमांचा शोध घेत असतांना तेथे खुराणा ट्रॅव्हल्स ऑफीसचे समोर, उड्डाण पुलाचे खाली पाच इसम संशयीतरित्या हातामध्ये बॅग घेवून थांबलेले दिसले. पोलिसांनी त्यांचेजवळ जावुन त्यांना ताब्यात घेवून त्यांना नाव, गाव विचारता त्यांनी आपले नाव शेख शोयब शेख उमर (वय २०) व्यवसाय मजुरी राहणार महाराजपुर जि. साहेबगंज राज्य झारखंड ह.मु. ताजबाग, नागपुर, शेख दिलचर शेख नसीरोद्दीन (वय १९) व्यवसाय मजुरी राहणार महाराजपुर जि. साहेबगंज राज्य झारखंड ह.मु. ताजबाग, नागपुर, शेख जियाद शेख मुजाहिद (वय २६) महाराजपुर जि. साहेबगंज राज्य झारखंड ह.मु.ताजबाग, नागपुर इतर दोन विधीसंघर्षीत बालके राहणार महाराजपुर जि. साहेबगंज राज्य झारखंड ह.मु.ताजबाग, नागपुर असे नाव सांगितले. तेंव्हा त्यांना झारखंड राज्यातुन नांदेड येथे येण्याचे कारण विचारण्यात आले असता ते समाधानकारक उत्तर देत नव्हते. उलट उडवा- उडवीचे उत्तर देत असल्याने पोलिसांनी त्यांची दोन पंचासमक्ष अंगझडती व त्यांचे ताब्यातील बॅगची पाहणी केली.
तेव्हा त्यांचे ताब्यातील बॅगमध्ये एकुण सोळा मोबाईल (एकुण किंमत चार लाख दोन हजार पाचशे रुपये) ताब्यात मिळुन आल्याने त्यांना सदरचे मोबाईल कोणाचे आहेत, याबाबत विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यांनी हे १६ मोबाईल हे आम्ही सर्वांनी मिळून चोरलेले असल्याची कबुली दिली. दि. १२ जानेवारी रोजी जिल्हा परभणी येथील भाजीपाला विक्री मंडई व बुधवार बाजार तरोडा नाका नांदेड येथे फिरुन बाजारातील लोकांचे खिशातील चोरी केलेले आहेत असे त्यांनी सांगितले. त्यावरुन वरील आरोपी व विधीसंघर्षीत बालक यांचे ताब्यातुन एकुण १६ मोबाईल सोबतचे दोन पंचासमक्ष सविस्तर वेगवेगळे जप्ती पंचनामा करून ताब्यात घेतले आहेत. पो.स्टे. भाग्यनगर मोबाईल चोरीबद्दल दोन गुन्हे दाखल आहेत.
पो.स्टे. भाग्यनगर गु.र.न १६/२०२२ कलम ३७९ भादवि मधील चोरीस गेलेला एक मोबाईल व पो.स्टे. भाग्यनगर गु.र.न १८/ २०२२ कलम ३७९ भादवि मधील चोरीस गेलेला एक मोबाईल व इतर १४ मोबाईल व तसेच तीन आरोपीतांना कोर्टासमोर हजर केले असता न्यायालयाने तिघांना पोलीस कोठडी व दोन विधीसंघर्षीत बालकांना बाल सुधारगृहात दाखल केले आहे. पोलीस अधिक्षक शेवाळे यांनी गुन्हे शोध पथकाचे अभिनंदन केले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻