Thursday, November 21, 2024

आता भाजपचा वाटतोय ना! खा. अशोक चव्हाण यांच्याकडून जय जय श्रीराम च्या घोषणा! व्हिडिओ वायरल

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड – जय जय श्रीराम च्या घोषणा देत खा. अशोक चव्हाण यांनी भाजप मेळाव्यात उत्साह भरला. जय जय श्रीराम च्या घोषणा देत त्यांनी, आता भाजपचा वाटतोय ना ! अशी विचारणाही उपस्थितांना केली. त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच वायरल होत आहे.

माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी येथे जय जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. त्यानंतर त्यांनी आता भाजपत आल्यासारखा वाटतोय ना! असे म्हणत जय जय श्रीराम, भारत माता की अशा घोषणा दिल्या. सहयोग कॅम्पस येथे झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी या घोषणा दिल्या. त्यांचा हा व्हिडिओ झाला सोशल माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
भारतीय जनता पक्षाचे बूथ कार्यकर्ता प्रशिक्षण संमेलन विष्णूपुरी येथील सहयोग कॅम्पस येथे मंगळवार दि.२७ रोजी आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा हे होते. यावेळी माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, खा. डॉ. अजित गोपछडे, भाजपा विभागीय संघटन मंत्री संजय कोडगे, माजी आ. अमरनाथ राजूरकर, माजी आ. डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर, गजानन घुगे, प्रदेश सचिव देवीदास राठोड, जिल्हाध्यक्ष डॉ. संतूकराव हंबर्डे, ॲड. किशोर देशमुख, महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, माजी आमदार सुभाषराव साबणे, चैतन्यबापू देशमुख, व्यंकटराव पाटील गोजेगावकर, प्रवीण साले, प्रणिताताई देवरे चिखलीकर, प्रविण पाटील चिखलीकर, सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड, माणिकराव लोहगावे, महिला मोर्चाचे अध्यक्ष पूनमताई पवार आदी उपस्थित होते.

यावेळी खा. अशोक चव्हाण यांच्यासह इतरांनी मार्गदर्शन केले. यावेळी नांदेड लोकसभा अंतर्गत नांदेड दक्षिण विधानसभा, नांदेड उत्तर विधानसभा, देगलूर बिलोली विधानसभा, नायगाव विधानसभा, मुखेड विधानसभा, भोकर विधानसभा क्षेत्रातील बूथ प्रमुख, बूथ कार्यकर्ते, शक्तीकेंद्र प्रमुख आदीसह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना अशोकराव चव्हाण म्हणाले की, गावपातळीवर कार्यकर्त्यांमध्ये एकोपा निर्माण करणे गरजेचे आहे. माझ्या भाजपा प्रवेशानंतर जिल्हाभरातून अनेकांनी भाजप प्रवेश केला आहे. त्यामुळे प्रत्येक गावपातळीवर जूने नवे भाजप कार्यकर्ते आता भाजपा मध्ये आले असले तरी त्यांच्यात एकोपा निर्माण करून देऊ, एकत्र लढू आणि भाजपा विजयी करु. मी भाजपात प्रवेश केल्यानंतर अवघ्या चोवीस तासात मला राज्यसभेवर खासदार होण्याची संधी पंतप्रधान मोदींनी दिली, याबाबत मी ऋण व्यक्त करतो असेही यावेळी खा. चव्हाण म्हणाले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!