Friday, November 22, 2024

आधी दारू पीत बसले आणि नंतर मित्राने मित्राचाच दगडाने ठेचून केला खून, धर्माबादमधील घटना; आरोपीला पोलीस कोठडी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- दारू पिण्याच्या कारणावरून दोन मित्रात सुरुवातीला वाद झाला. यातूनच एकाने आपल्या मित्रावर हल्ला चढविला. एवढेच नाही तर त्याला बेदम मारहाण करून दगडाने डोके ठेचून खून केल्याची घटना दोन मे रोजी धर्माबाद शहरातील उर्दू शाळेच्या परिसरात घडली. धर्माबादचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याला धर्माबाद न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीश श्री हरणे यांनी सहा मेपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.

धर्माबाद शहरातील सरस्वतीनगर येथील क्रांती बन्सी उबाळे (वय 28) आणि त्याचा मित्र सचिन उत्तम कांचने (वय 23) हे दोघेजण शहरातील उर्दू शाळेच्या पाठीमागे मोकळ्या जागेत दारू पीत बसले होते. कुठल्यातरी जुन्या वादाचे कारण पुढे करून या दोघात शाब्दिक बाचाबाची झाली. एवढेच नाही तर सचिन कांचणे याने क्रांती उबाळे याला जबर मारहाण केली आणि त्याचे दगडाने डोके ठेचून खून केला. यानंतर सचिन कांचने हा घटनास्थळावरून पसार झाला.

काही नागरिकांनी ही माहिती धर्माबाद पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठले. मृतदेहाचा पंचनामा करून धर्माबाद शासकीय रुग्णालयात शिवविच्छेदनासाठी दाखल केला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत खून करून एका गोठ्यात लपून बसलेल्या सचिन कांचने याला पोलिसांनी अटक केली. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणी धुरपतबाई भीमराव दगडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सचिन उत्तम कांचनेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते करत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!