ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद 👆🏻
नांदेड- आज रविवार दि. १० एप्रिल रोजी पहाटे अज्ञात दोन चोरट्यांनी दयानंदनगर भागातील दत्त मंदिर फोडले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून नंतर दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी पळवली. देवाघरी त्यांनी केलेला चोरीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
दानपेटीत असणारे जवळपास एक लाख रुपये चोरट्यांनी पळवले असल्याचे मंदिराच्या पुजाऱ्याने सांगितले. चोरीच्या या घटनेत दोन जण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत असून सुरुवातीला यातील एकाने मंदिराच्या बाहेरून देवाला हात जोडून नमस्कार केला. आणि नंतर मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर गाभाऱ्यात शिरून त्यांनी दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरली.
या घटनेनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डॉक्टर नितीन काशीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाव्हुळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी पुजाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻