ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त गुणवंत पाल्यांचा सत्कार
नांदेड- प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते, कुणाला अभ्यास आवडतो तर कुणाला खेळ आवडतो, कुणाला डॉक्टर होण्याची इच्छा असते तर कुणाला इंजिनिअर होण्याची इच्छा असते, प्रत्येकाची आवड पालकांच्या आवडीनुसार जुळेल असे कधी होत नाही. पालकांची आणि पाल्यांची आवड बऱ्याच वेळा जुळत नाही, त्यामुळे पालकांनी पाल्यांना आवडीच्या क्षेत्रात ध्येय निश्चित करण्याचे स्वातंत्र्य द्यावे, असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केले. ते विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त गुणवंत पाल्यांचा सत्कार प्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर त्यांच्यासमवेत विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे, वित्त व लेखाधिकारी आनंद बारपुते, अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. ज्ञानोबा मुंढे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे यांची उपस्थिती होती.
यावेळी विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांच्या पाल्यांनी इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत किमान ८० टक्के गुण प्राप्त केल्याबद्दल पाल्यांचा सत्कार करण्यात आला. २०२० मध्ये इयत्ता बारावीमध्ये ८० टक्क्यांच्या वर गुण घेतलेले विद्यार्थी ऋतुजा उरे, रुहीना तबस्सुम पठाण, कांचन कल्याणकर हे होते. तर इयत्ता दहावीतील विद्यार्थी सायली शेंडगे, मयुर जायभाये, कृष्णा कोळशिकवार, आवंतिका शिंदे, आकाश शिंदे, सुमित बिराजदार, आदित्य भोसले, गायत्री हंबर्डे, ओम रोकडे, सायली झांगडे, अबोली हटकर, मंजेश जाधव, रोहन पोपळे, श्रुती आदुडे, शार्दुल मंगरूळकर, प्रगती पवार, श्रावणी तंगलवाड, जैनिका बिसेन, सुयोग मुंढे, समृद्धी मोहरीर आणि तनुजा मोरे इ विद्यार्थी होते.
सन २०२१ मधील इयत्ता बारावी मध्ये गुणवंत पाल्यांमध्ये सौरभ पवार, प्रेरणा सुरवसे, वैष्णवी तेलंग, युवराज दर्शनकार, संस्कृती मोरे, संकेत भोसले, लाविषा पाटील, अनिस सरदेशमुख, आशिष सवणे, साक्षी बावळे, प्रशांत शामे आणि शंतनु लुटे इ. समावेश आहे. इयत्ता दहावीमध्ये गायत्री हंबर्डे, आरती यलगटे, ओमकार काटे, ईशान पेक्कमवार, सोहन पोपळे, नचिकेत देशमुख, हर्षदीप मांडे, मृगनयनी घोळक, कल्याणी हंबर्डे, श्रेया कांबळे, कांचन कुबडे, आदित्य हंबर्डे, जसविंनकौर सिलेदार आणि माधव सातपुते हे आहेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे यांनी केले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻