Tuesday, December 2, 2025

उद्या मतमोजणी नाही, राज्यातील सर्व नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरला एकत्रच होणार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नागपूर/ नांदेड (प्रतिनिधी)- आज मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील 11 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसह राज्यात अनेक ठिकाणी होत असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार नाही.

राज्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी एकत्र जाहीर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश दिला आहे. २० डिसेंबरच्या निवडणुकीपर्यंत आचारसंहिता लागू राहील आणि कोणालाही एक्झिट पोल प्रसिद्ध करता येणार नसल्याचे असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

आज राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 264 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी मतदान होत आहे. नियोजित वेळापत्रकानुसार सुरुवातीला 2 डिसेंबरला मतदान होत असलेल्या या निवडणुकीची मतमोजणी 3 डिसेंबरला होऊन निकाल लागणार असे जाहीर करण्यात आले होते. पण न्यायालयीन अपिलाचा पेच निर्माण झालेल्या ठिकाणी 20 डिसेंबरला मतदान आणि 21 डिसेंबरला मतमोजणीचा आदेश काढण्यात आला.

राज्यातील २४ नगरपालिका आणि विविध ७६ पालिकांमधील १५४ सदस्यपदाच्या जागांवरील निवडणुकांची प्रक्रिया स्थगित करण्याचे आदेश देण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले. ही निवडणूक स्थगिती झालेल्या पालिकांमध्ये २० डिसेंबर रोजी मतदान होणार असून २१ डिसेंबरला मतमोजणी होईल.

त्यानुसार आता सर्वच नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार असून त्या दिवशीच निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!