Thursday, November 21, 2024

उद्या राज्यस्तरीय ऑनलाईन हळद कार्यशाळा; कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याहस्ते उदघाटन

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे -खासदार हेमंत पाटील

नांदेड/ हिंगोली/ यवतमाळ:  उद्या दि. 22 जानेवारी रोजी राज्यस्तरीय ऑनलाईन हळद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याहस्ते या कार्यशाळेचे उदघाटन होणार आहे.या राज्यस्तरीय ऑनलाईन हळद कार्यशाळेत राज्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, आणि हळदीचे उत्पादन वाढविण्यासाठी करण्यात येणाऱ्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्यस्तरीय हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समितीचे अध्यक्ष खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे. 

या ऑनलाईन एकदिवसीय कार्यशाळेचे उदघाटन राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते होणार असून हळद संदर्भांत मार्गदर्शन लाभणार आहे . रविवार २३ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजता ऑनलाईन पद्धतीने झूम आणि फेसबुक लाईव्ह या सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंदुहृदयसम्राट कै.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी खासदार हेमंत पाटील यांच्या संकल्पनेतून एक दिवसीय हळद कार्यशाळेचे आयोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

हळद हे  महाराष्ट्रातील नगदी आणि प्रमुख पीक आहे. नगदी चलनामुळे शेतकऱ्यांचा या पिकाकडे कल वाढत आहे. उत्तम गुणवत्ता आणि दर्जा असलेल्या हळदीची मागणी जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु शेतकऱ्यांकडून हळद काढणी करताना व त्यावर प्रक्रिया करताना होणाऱ्या सर्वसामान्य चुकांमुळे हळदीचा दर्जा व गुणवत्ता, प्रत घसरत आहे. याबाबत शेतकऱ्यांना सखोल आणि अचूक मार्गदर्शन देण्याच्या उद्देशाने आणि राज्यातील हळदीच्या उत्पादनाचा टक्का वाढावा यासाठीच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे व भारतीय कृषी अनुसंधान परिषद भारत सरकार,  कै. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला आणि  कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय “हळद काढणी व गुणवत्ता वाढ ” या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यशाळेला देशभरातील नामवंत शास्त्रज्ञ उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. वेळी अवेळी पडणारा पाऊस, हवामानातील बदल, नवनवीन पडणाऱ्या रोगाला प्रतिकार करण्याची क्षमता हळदीमध्ये असल्यामुळे शेतकरी या पिकाकडे वळला आहे. मात्र हळद लागवडीसाठी लागणारे ठिंबक सिंचन, कीटक नाशक, खते यावर शेतकऱ्यांचा मोठा खर्च होतो. याबाबत शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन मिळण्याची गरज लक्षात घेऊन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली.

हळदीची गुणवत्ता उत्तम असल्याने बाजारपेठेत हळदीला मोठी मागणी आहे, ही बाब लक्षात घेऊन खासदार हेमंत पाटील यांनी केंद्र सरकार आणि राज्यशासनाकडे याबाबत  सातत्याने पाठपुरावा करून मंजुरी मिळवली आहे. त्यांनुषगाने हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समितीची स्थापना करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. सदर समितीने धोरणाचे  प्रारूप राज्यशासनाकडे पाठविले आहे. त्यामुळेच आता राज्यातील हळद लागवडीचे क्षेत्र वाढावे या उद्देशाने आयोजित केलेल्या या कार्यशाळेला मोठ्या संख्येने शेतकरी बांधवानी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहनही खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे. या संदर्भात  संबंधित कृषी सहायक आणि कृषी विभागाला संपर्क करावा आणि  अधिक माहितीसाठी  https://www.haladparishad.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!