ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
मारतळा परिसरात कारवाई
नायगाव– नांदेड शहर व परिसरात महामार्ग परिसरात अनधिकृतरित्या बायोडिझेलची काळ्याबाजारात विक्री करणाऱ्या अड्ड्यावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून कारवाई सुरू केली आहे. मागील आठ दिवसांपूर्वी नांदेड शहरात व परिसरात बायोडीझेलवर कारवाई केल्यानंतर मंगळवारी दि.२८ रोजी रात्री आठ वाजता मारतळा परिसरात चंद्रलोक धाबा परिसरात उपविभागीय अधिकारी विकास माने आणि लोहाचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या पथकाने कारवाई केली.
यावेळी एका आयचर टेम्पोमधून जवळपास तीन हजार लिटर बायोडिझेल जप्त केल्याची प्राथमिक माहिती आहे. या टेम्पोमधून मोटरद्वारे (एपी25 व्ही 27 23) मध्ये बायोडिझेल भरत असताना या पथकाने कारवाई केली. यावेळी दोघांना ताब्यात सुद्धा घेतल्याचे सांगण्यात आले आहे. सदरचा धाबा मारतळा परिसरात असून जप्त केलेला आयचर टेम्पो आणि मुद्देमाल उस्माननगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या कारवाईमुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात बायोडिझेलचा गोरखधंदा उघडकीस आल्याने आणि अनधिकृत बायोडिझेल विकणार्यांचे धाबे दणाणले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻