ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
अर्धापुर नगरपंचायतीच्या ४ आणि ५ ग्राम पंचायत जागांसाठी निवडणूक
अर्धापुर – नगरपंचायतींच्या ४ जागांसाठी आज दि.२९ बुधवार रोजीपासून निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे. तसेच अर्धापूर तालुक्यातील आमराबाद, आमराबाद तांडा, शेलगांव खु, देळूब खु. व रोडगी येथील ग्रामपंचायततील रिक्त झालेल्या प्रभागात पोटनिवडणूकीचा कार्यक्रमही जाहीर झाला असून आजपासून नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहेत.
अर्धापूर नगरपंचायतींच्या ४ वार्डासाठी निवडणूक होणार असून या निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्ष काँग्रेस, भाजप, शिवसेना, एमआयएम, राष्ट्रवादीसह अपक्ष उमेदवार निवडणूकीच्या मैदानात उतरणार असल्याने दिसून येत आहे. त्यामुळे या उर्वरित जागांवरील नगरपंचायत निवडणूकही चुरशीची होणार आहे.
नगरपंचायतींच्या १३ जागांसाठी दि. २१ रोजी मतदान झाले असून यात अनेकांनी दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारांना मदत केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या ४ जागांवरील उमेदवारांनी धोका दिल्याचा बदल्या घेण्यासाठी अनेकजण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे बोलले जात आहे. दि. २९ डिसेंबर ते ३ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून दि. ४ जानेवारी रोजी नामनिर्देशित पत्राची छाननी होणार आहे. दि. १० जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून दि. १८ रोजी मतदान तर १९ रोजी मतमोजणी होणार आहे.
याचबरोबर अर्धापूर तालुक्यातील ५ गावांच्या ग्रामपंचायत पोटनिवडणूकीचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे. या निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व्ही एम मुंडकर यांची तर उमेदवार खर्च विभाग प्रमुख लेखा विभागातील संजय नरमिटवार यांची नियुक्ती तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी केली आहे. छाननी दि.४ जानेवारी रोजी असून या ग्रामपंचायतीची निवडणूक मतदान दि.१८ जानेवारी तर मतमोजणी १९ जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे: अर्ज सादर करण्याच्या तारखा दि. २९ डिसेंबर ते दि. ३ जानेवारी (सुटी वगळून), अर्ज छाननी व वैध अर्जाची यादी दि. १० जानेवारी व अर्ज मागे घेण्याची मुदत तर मतदान दि.१८ जानेवारी तर मतमोजणी व निकाल दि.१९ जानेवारी रोजी असणार आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻