Friday, November 22, 2024

ओवैसी यांचे कट्टर विरोधक अशी ओळख असणारे हैद्राबादेतील आमदार राजासिंग ठाकूर यांच्यावर नांदेडमध्ये गुन्हा दाखल

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- अजमेर येथील मुस्लीम धर्मीयांच्या गुरुंबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी हैदराबाद येथील भाजपाचे आमदार राजासिंग ठाकूर यांच्याविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार राजासिंग ठाकूर यांची एमआयएमचे प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे कट्टर राजकीय विरोधक अशी ओळख आहे.

इतवारा पोलीस ठाण्याच्या परिसरात राहणाऱ्या सर्व पक्षाच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी आज सोमवार दि. 6 जून रोजी हैदराबाद येथील भाजपाचे आमदार राजासिंग ठाकूर यांनी मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्याप्रकरणी इतवारा पोलिस ठाणे गाठून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या तक्रारीवरून अखेर पोलिसांनी आमदार राजासिंग ठाकूर यांच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

इतवारा ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी आलेल्या शिष्टमंडळातील सर्व पक्षाच्या मुस्लिम कार्यकर्त्यांशी चर्चा करून शांतता राखण्याचे आवाहन केले. यावेळी या शिष्टमंडळाने उपविभागीय पोलिस अधिकारी (इतवारा) डॉ. सिद्धेश्वर भोरे यांचीही भेट घेतली. शिष्टमंडळात एमआयएमचे सय्यद मोईन, उपमहापौर अब्दुल गफार, शेर अली, इद्रिश कादरी यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!