ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– दुकानावर जातो म्हणून घरातून बाहेर पडलेल्या 19 वर्षीय युवकाचा आमदुरा शिवारात तब्बल चार दिवसांनी मृतदेह आढळला. त्याच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याचा गुन्हा अज्ञाताविरुद्ध मुदखेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथील चंद्रकांत उर्फ चांदू शंकर पवार (वय 19) हा दि. 29 एप्रिल रोजी किराणा सामान आणण्यासाठी दुकानावर जातो म्हणून घरातून निघून गेला तो परत आला नाही. यानंतर त्याचा घरच्यांनी शोध घेतला. फोटो व्हाट्सअप माध्यमातून व्हायरल केला. परिसरात व शिवारात त्याचा शोध घेत असताना दोन मे रोजी शेतातील गवतामध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. या नंतर एकच खळबळ उडाली. मुदखेड पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीनंतर चंद्रकांत पवार यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.
मयताचे वडील शंकर व्यंकटराव पवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मारेकर्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक महेश शर्मा करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻