ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
लातूर- गणिताचे संशोधक श्रीनिवास रामानूजन यांच्या जयंतीदिनी गणितदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त येथील संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात (कॉक्सिट) विद्यार्थ्यांच्या पोस्टर सादरीकरण स्पर्धा घेऊन त्याचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉ. एम. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील सर्वच विभागातील विद्यार्थ्यांसाठी गणित दिनानिमित्त पोस्टर सादरीकरण स्पर्धा घेण्यात आल्या. यात ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत रामानूजन यांचे जीवनकार्य व दररोजच्या व्यवहारात गणिताचा होणारा वापर यावर आपले पोस्टर प्रदर्शन सादर केले होते. सहभागी विद्यार्थ्यांच्या पोस्टरचे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यास महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांनी भेट देवून माहिती जाणून घेतली.
यावेळी कॉक्सिटचे प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, उपप्राचार्य बी. एल. गायकवाड, व्ही. व्ही. भोसले, डी. आर. सोमवंशी, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. कैलास जाधव, डी. एस. महामुनी, प्रा. ईश्वर पाटील, प्रा. एस. व्ही. देशमुख यांनी प्रदर्शनाची पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या पोस्टर सादरीकरण प्रदर्शनासाठी गणित विषयाचे प्रा. नितीन वाघमारे, प्रा. रोहित जाधव, प्रा. प्रवीण सूर्यवंशी, प्रा. आकाश गुरमे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻