ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ ऑनलाइन पद्धतीने अध्यापन सुरू- जिल्हाधिकारी डॉ. विपिन
नांदेड- वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग दिनांक 30 जानेवारी 2022 पर्यंत प्रत्यक्ष अध्यापनासाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत.
राज्यामध्ये कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर राज्य शासनाकडून पहिली ते सातवीचे वर्ग दिनांक १ डिसेंबर २०२१ पासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली होती. परंतु आता कोविड विषाणूच्या नवीन व्हेरीएंटचा (ओमायक्रोन) वेगाने होत असलेला प्रसार व जिल्ह्यामध्ये या विषाणूचा शिरकाव झालेला निदर्शनास आलेला आहे. यासाठी या विषाणू विरोधी प्रतिबंधात्मक उपाययोजना व आवश्यक ती खबरदारी घेण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायदा अन्वये प्राप्त अधिकारानुसार नांदेड जिल्हा क्षेत्रामध्ये Covid-19 च्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी काही आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.
त्यानुसार इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग दिनांक 30 जानेवारी 2022 पर्यंत प्रत्यक्ष अध्यापनासाठी बंद राहतील. केवळ ऑनलाईन पद्धतीने शिक्षकांचे अध्यापन सुरू राहील. इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग कोरोना विषयक नियमांचे पालन करून प्रत्यक्ष सुरू राहतील.
Covid-19 विषयक सर्व आदेशांचे व मार्गदर्शक सूचनांचे पालन शाळा व्यवस्थापनाने करावे तसेच रुग्ण आढळून आल्यास तात्काळ शाळा बंद करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. शिक्षकांनी कोविड काळात शाळेत उपस्थित राहून ऑनलाइन शिक्षण विषयक कामकाज व पोलीस प्रतिबंधक विषयक जिल्हा प्रशासनाने दिलेली सर्व जबाबदारी पार पाडावी, असे आदेशीत करण्यात आले आहे. हा आदेश दि. 10 जानेवारी 2022 पासून ते 30 जानेवारी 22 पर्यंत नांदेड जिल्हा क्षेत्रात लागू राहील असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी कळविले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻