ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- शहरातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकांनी बनावट दस्तावेज, खोटे लेआउट खोटे तयार करून ते खरे आहे असे भासवून शासनाची फसवणूक केल्याचे उघड।झाले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे मालमत्ता खरेदी करणाऱ्या ग्राहकांमधून खळबळ उडाली असून अशा ग्राहकांनी अधिक सावधानता बाळगणे आवश्यक झाले आहे.
नांदेड शहराच्या सांगवी आणि जैन मंदिर परिसरात राहणारे मोठे बांधकाम व्यावसायिक रेणापूरकर यांनी दि. ८ ते २० एप्रिलच्या दरम्यान सहदुय्यम निबंधक वर्ग- 2 नांदेड यांच्या कार्यालयात संगणमत करून बनावट दस्तावेज, खोटे लेआउट तयार केले. एवढेच नाही तर काही ग्राहकांना या बोगस कागदपत्रांधारे प्लॉटची रजिस्ट्रीही करून दिली. हा धक्कादायक प्रकार तपासणीअंती उघड झाला.
उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) चंद्रसेन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सहदुय्यम निबंधक अशोक बाबुराव धोंडगे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर यांनी शकुंतलाबाई विश्वनाथ रेणापूरकर, भरत विश्वनाथ रेणापूरकर, किशोर अनंतराव रेणापूरकर आणि बलभीम विश्वनाथ रेणापूरकर यांच्याविरुद्ध कलम 420, 465, 468, 471, 34 भादवि सहकलम 82, 83 नोंदणी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास स्वतः पोलीस निरीक्षक डॉ. काशीकर करत आहेत. जुन्या अशा बांधकाम व्यावसायिकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने नांदेडमध्ये मालमत्ता खरेदी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻