ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काँग्रेसला ‘दे धक्का’ दिला आहे. काँग्रेसचे नांदेड मार्केट कमिटीचेे सभापती संभाजी पाटील पुणेगांवकर यांनी दोन संचालकासह खा. चिखलीकर यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.
काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत नांदेड बाजार समितीचे सभापती संभाजी पाटील पुणेगांवकर, संचालक नागोराव पाटील, संचालक राम पाटील कदम, उपसरपंच दादाराव पाटील यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्त्यांनी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश केला आहे. हा काँग्रेससाठी आणि पर्यायाने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासाठी स्थानिक पातळीवर धक्का मानला जात आहे.
नांदेड मार्केट कमिटीवर काँग्रेसचे एकहाती वर्चस्व आहे. या मार्केट कमिटीचे सभापती संभाजी पाटील पुणेगांवकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खा. प्रतापराव यांच्या जनसंपर्क कार्यालयात आपल्या अनेक समर्थकांसह भाजपात प्रवेश केला आहे. खा. प्रतापराव यांनी संभाजी पाटील यांच्यासह त्यांच्या सर्व समर्थकांनी भाजपात प्रवेश केल्याबद्दल पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर यांनी संभाजी पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांना भाजपात प्रवेश देण्यात आल्याचे यावेळी जाहीर केले. सभापती संभाजी पाटील पुणेगावकर यांच्यासह मार्केट कमिटीचे संचालक राम पाटील कदम, संचालक नागोराव पुंडलिकराव पाटील, पुणेगावचे उपसरपंच दादाराव पाटील, विजय कदम, राजेश कदम, बळवंत कदम, रामा खाडे, सुगंध कदम, दादाराव कदम, राजेश्वर कदम, माधव कदम आदीसह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये खा. प्रतापराव यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश झाला.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य मिलिंद देशमुख, प्रदेश कार्यकारणी सदस्य धर्मराज देशमुख, बालाजीराव पाटील पुणेगावकर, भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दिलीप कंदकुर्ते, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव अनिल पाटील बोरगावकर, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष शिरसागर, पंचायत समितीचे माजी सभापती मोतीराम पाटील ब्राह्मणवाडेकर, भाजपा सोशल मीडिया संयोजक राज यादव, प्रभू पाटील इंगळे आदींची उपस्थिती होती.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻