ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा खरा सूत्रधार शोधून काढून त्याच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने नांदेडमध्येही आंदोलन करण्यात आले. शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर निषेध व्यक्त करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या घरावर शुक्रवारी दिनांक ८ एप्रिल रोजी काही एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. ही बाब महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभनीय आहे. या प्रकरणातील आरोपी शोधून काढून मुख्य सूत्रधार कोण आहेत ते शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.
या घटनेचा नांदेड जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (ग्रामीण) यांनी तीव्र शब्दात निषेध केला असून एसटी आंदोलक कार्यकर्त्यांनी हा हल्ला कोणाचा इशाऱ्यावरुन केला, त्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. यावेळी माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, प्रा. डी. बी. जांभरुणकर, जिल्हाध्यक्ष नांदेड ग्रामीण हरिहरराव भोसीकर, सुभाष गायकवाड, डॉ. परशुराम वरपडे, वसंत सुगावे, कल्पनाताई डोंगळीकर, प्रांजली रावणगावकर, बालाजी शेळके, प्रा. गजानन पवार, रेखा राहिरे, शिवानंद हिप्परकर, माधव चांदणे, सुनील पतंगे, रमेश विजापूरकर आदींची उपस्थिती होती.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻