Thursday, November 21, 2024

चार माजी मंत्र्यांसह इतर कट्टर जुने विरोधक आले एकत्र: खा. अशोक चव्हाण यांनी घेतली भाजपच्या आजी- माजी खासदार- आमदारांची बैठक; अशोकराव- प्रतापराव एकत्र

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड – राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृहात भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातील आजी- माजी खासदार-आमदार आणि भाजपचे प्रमुख पदाधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अशोकराव चव्हाण यांचे स्वागत केले. खा. अशोकराव चव्हाण – खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्यासह एकेकाळी एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असलेले जुने विरोधक एकत्र आल्याचे अनोखे चित्र बैठकीत पहावयास मिळाले. माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माजी राज्यमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर या तीन माजी मंत्र्यांची या बैठकीत उपस्थिती होती.

अशोकराव चव्हाण यांनी १२ फेब्रुवारी रोजी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन १३ फेब्रुवारी रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर लगेच त्यांना राज्यसभेची खासदारकी बहाल मिळाली. भाजपमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदाच काल शनिवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी ते नांदेडला आले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर आज शनिवार दि. २४ रोजी दुपारी महानगरपालिकेच्या जवळपास ५५ माजी नगरसेवकांनी खा. अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सायंकाळी खासदार चव्हाण यांनी भाजपच्या आजी- माजी खासदार-आमदार आणि प्रमुख पदाधिकारी यांची बैठक येथील विश्रागृहात घेतली. पूर्वाश्रमीचे काँग्रेसी असणारे हे नेते काँग्रेस पक्षात असतानाही एकमेकांचे राजकीय विरोधकच मानले जात. कालांतराने हे एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी बनले होते. हे सर्व नेते आता एकत्र आल्याचे अनोखे चित्र आज दिसून आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दि. २८ फेब्रुवारी रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या स्वागताच्या तयारी संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आल्याचे समजते. तसेच पक्ष घेऊन पक्ष बांधणीसंदर्भात चर्चा झाल्याचेही सांगण्यात येते.

यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, माजी राज्यमंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी राज्यमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, खासदार डॉ. अजित गोपछडे, विधान परिषदेचे आमदार राम पाटील रातोळीकर, किनवटचे आमदार भीमराव केराम, मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड, नायगावचे आमदार राजेश पवार, माजी आमदार अमरनाथ राजूरकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार सुभाष साबणे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव देविदास राठोड, भारतीय जनता पार्टीचे महा विजय 2024 मराठवाडा संयोजक प्रवीण साले, प्रदेश कार्यकारणी सदस्य चैतन्यबापू देशमुख, भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, श्रावण भिलवंडे, बालाजी बच्चेवार आदींची उपस्थिती होती.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!