ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
देगलूर- काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर तीन राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक देगलूरमध्ये पार पडली. येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयात महाराष्ट्र, तेलंगना व कर्नाटक या तीन राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.
खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा दि. ७ रोजी सायंकाळी तेलंगणा राज्यातून नांदेड जिल्ह्यात प्रवेश करणार आहेत. राहुल गांधी महाराष्ट्रात देगलूरमार्गे प्रवेश करणार असून त्यानिमित्त देगलूर येथे त्यांचे स्वागत व सायंकाळी मुक्काम आहे.
या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात पार पडलेल्या या बैठकीत श्रीकृष्ण कोकाटे (नांदेड पोलीस अधीक्षक), जी. श्रीधर (हिंगोली पोलीस अधीक्षक), निलेश मोरे (अप्पर पोलीस अधीक्षक), सचिन सांगळे (उपविभागीय पोलीस अधिकारी), अर्चित चांडक (सहायक पोलीस अधीक्षक बिलोली), निकातन कदम ( सहायक पोलीस अधीक्षक चाकूर), श्रीमती शफाकत आमाना (सहाय्यक पोलीस अधीक्षक भोकर), स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, देगलूरचे पोलीस निरीक्षक सोहन माछरे देगलूर, बी. श्रीनिवास रेड्डी (पोलीस अधीक्षक कामारेड्डी) आर. प्रभाकरराव (एसीपी आर्मूर), जगन्नाथ रेडी (एसडीपीओ बासवाडा), विनोद रेड्डी (पोलीस निरीक्षक मुधोळ), कृष्णा ( सर्कल पोलीस इन्स्पेक्टर बिचकुंदा), श्रीनिवास राज ( सी पी बोधन) महेंद्र रेड्डी (पीएसआय कोटगीर), शिवकुमार (पीएसआय मदनूर), प्रतूक शंकर (सहाय्यक पोलीस अधीक्षक भालकी) आदी वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन डीवायएसपी सचिन सांगळे यांनी केले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻