ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ वजिराबाद पोलिसांच्या कारवाईत धारदार शस्त्रेही जप्त
नांदेड– चोरलेला माल वाटून घेण्याच्या कारणावरून चोरट्यांमध्ये वाद होऊन भांडणे सुरू झाली, आणि यातूनच ते पोलिसांच्या तावडीत सापडल्याचा प्रकार नांदेडमध्ये घडला आहे. वजिराबाद पोलिसांनी केलेल्या कारवाईत आठ जणांच्या टोळीला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीच्या २ दुचाकी, १७ मोबाईलसह इतर ऐवज जप्त करण्यात आला आहे.
शहराच्या विविध भागातून मोबाईल चोरी करणाऱ्या या चोरट्यांच्या टोळीला वजिराबाद पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १७ मोबाईल, दुचाकी खंजर आदी असा तीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत. या कारवाईत चोरट्यांकडून धारदार शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.
शहरातील वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार व त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार गजानन किडे, विजयकुमार नंदे, मनोज परदेशी, व्यंकट गंगुलवार, शरदचंद्र चावरे, संतोष बेल्लुरोड, शेख इमरान, बालाजी कदम यांना सोबत घेऊन मिळालेल्या माहितीनुसार दि. 29 एप्रिल रोजी त्यांनी रेल्वे स्थानक परिसरातील शेख अशफाक शेख रजाक रा.नुरी चौक नांदेड, सुरज उर्फ सुऱ्या शंकर सोनटक्के रा.कुंभारगल्ली चिखलवाडी नांदेड, शेख सोहेल शेख सत्तार रा.तेहरानगर कॉलनी नांदेड, शेख सोहेल शेख रजाक रा. देगलूर नाका नांदेड, चंद्रकांत प्रकाश नेरले रा.कुंभारगल्ली नांदेड, मदन केशव बटेवाड, रा.कोल्हा ता.मुदखेड आणि दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतले. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व चोरटे चोरी केलेल्या ऐवजाचा वाटा करतांना आपसात भांडत होते.
या चोरट्यांकडून पोलिसांनी भाग्यनगर, अर्धापूर, मुदखेड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरलेल्या तीन दुचाकी गाड्या जप्त केल्या. यातील दोन अल्पवयीन बालकांकडून 17 चोरलेले मोबाईल जप्त केले. या चोरट्यांकडून एकूण दोन लाख सहा हजार 300 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या चोरट्यांनी केलेले उमरी येथील दोन दरोड्याचे गुन्हे, भाग्यनगर येथील दोन चोरीचे गुन्हे आणि मुदखेड व अर्धापूर येथील एक-एक चोरीचा गुन्हा असे गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्हेगारांना पुढील तपासासाठी पोलीस ठाणे अर्धापूर, भाग्यनगर व उमरी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, पोलीस उपअधिक्षक (शहर) चंद्रसेन देशमुख, गृह पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्विनी जगताप, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, जगदीश भंडरवार आदी अधिकाऱ्यांनी वजिराबाद गुन्हे शोध पथकाचे कौतुक केले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻