Wednesday, February 5, 2025

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची बदली; राहुल कर्डिले नांदेडचे नवीन जिल्हाधिकारी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

राज्यातील 13 IAS अधिकाऱ्यांची बदली

नांदेड (प्रतिनिधी)- मागील दोन ते अडीच वर्षापासून नांदेड जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले अभिजीत राऊत यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त जागी नवी मुंबई सिडको येथील सह व्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डिले यांना पाठविण्यात आले आहे. राजाच्या अप्पर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांनी राज्यातील 13 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

राज्याच्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची बदली छत्रपती संभाजीनगर येथील वस्तू व सेवा कर विभागाचे सह आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. सध्या त्या ठिकाणी मिलिंद कुमार साळवे हे कार्यरत आहेत. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लोकसभा, लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुका यशस्वी करून जिल्ह्यात सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले. अभिजीत राऊत यांच्या जागी नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून नवी मुंबई सिडको येथील सह व्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डिले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील 13 IAS अधिकाऱ्यांची बदली : कोणाची बदली कुठे झाली?

  • 1. श्री. प्रवीण दराडे (IAS:RR:1998) यांची प्रधान सचिव, (सहकार आणि विपणन), सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
  • 2. श्री पंकज कुमार (IAS:RR:2002) यांची सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी (2), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • 3. श्री नितीन पाटील (IAS:SCS:2007) सचिव, राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई यांची आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
  • 4. श्रीमती श्वेता सिंघल (IAS:RR:2009) राज्यपालांच्या सचिव, महाराष्ट्र यांची विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • 5. डॉ. प्रशांत नरनावरे, (IAS:RR:2009) सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी (2), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची राज्यपाल, महाराष्ट्र, मलबार हिल, मुंबई यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • 6. श्री अनिल भंडारी (IAS:RR:2010) सह मुख्य कार्यकारी अधिकारी, MIDC, मुंबई यांची संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • 7. श्री पी.के.डांगे (IAS:SCS:2011) आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई यांची सचिव, राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
  • 8. श्री एस. राममूर्ती (IAS:RR:2013) सचिव, शुल्क नियामक प्राधिकरण, मुंबई यांची राज्यपाल, महाराष्ट्र, मलबार हिल, मुंबई यांचे उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • 9. श्री अभिजित राऊत (IAS:RR:2013) जिल्हाधिकारी, नांदेड यांची सहआयुक्त, राज्य कर, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • 10. श्री मिलिंदकुमार साळवे (IAS:SCS:2013) सह आयुक्त, राज्य कर, छत्रपती संभाजी नगर यांची, अल्पसंख्याक विकास, छत्रपती संभाजी नगर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
  • 11. श्री राहुल कर्डिले (IAS:RR:2015) सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई यांची जिल्हाधिकारी, नांदेड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • 12. श्रीमती. माधवी सरदेशमुख (IAS:SCS:2015) मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, कल्याण-डोंबिवली यांची संचालक, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • 13. श्री अमित रंजन (IAS:RR:2022) सहाय्यक जिल्हाधिकारी, चारमोशी उपविभाग, गडचिरोली यांची प्रकल्प अधिकारी, ITDP, पांढरकवडा, आणि सहायक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग, यवतमाळ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!