ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
वाजेगाव पोलीस चौकीशेजारीच मारली धाड
नांदेड- जिल्ह्यात व शहरात विनापरवाना बायोडिझेल विकणारी टोळी सक्रिय झाली आहे. या टोळीवर पाळत ठेवत खुद्द जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सोमवारी दि. २० डिसेंबर रोजी सकाळी नांदेड ग्रामीण पोलीसांच्या वाजेगाव चौकीच्या पाठीमागे कारवाई करुन १७ हजार लिटर बायोडिझेलचा साठा जप्त केला.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाजेगाव पोलीस चौकीच्या मागे असलेल्या आळणी बुवा मठाजवळ एका शटरमध्ये धाड टाकली. लगेच त्यांनी पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांना बोलावून घेतले. त्या ठिकाणी एका मोठ्या शटरमध्ये तीन मोठ- मोठ्या प्लॅस्टीक टाक्या आणि एक निळ्या रंगाची त्यापेक्षा लहान प्लॉस्टीक टॉकी सापडली. या टाक्यांना जोडून पेट्रोलपंपमध्ये असतात तसे पाईप जोडलेले होते. या पाईपांना वापरण्यासाठी दोन अश्वशक्तीची मोटार जोडलेल्या होत्या. सोबतच त्या ठिकाणी रिकामा झालेला एक बायोडिझेल टॅंकर सुध्दा होता. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक आल्यानंतर नांदेड ग्रामीण पोलीस निरिक्षक अशोक घोरबांडसुध्दा घटनास्थळी दाखल झाले.मिळालेल्या माहितीनुसार १७ हजार लिटर बायोडिझेल आणि शटरमधील सर्व साहित्य तसेच रिकामा झालेला एक टॅंकर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात देण्यात आला आहे.
गुन्हे शोध पथकाने या बायोडिझेल पंपचा स्वत:च शोध घ्यायला हवा होता. पण गुन्हे शोध पथक धाबे तपासण्यातच आणि त्यांच्यासोबत राडा करण्यातच व्यस्त आहे. पण हा बायोडिझेल पंप शोध जिल्हाधिकाऱ्यांनी केला. आणि त्यानंतर आता गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे काम करत आहे. बायोडिझेल पकडले त्या ठिकाणी तीन व्यक्ती पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस मूळ मालकाच्या शोधात आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻