ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– कंधार तालुक्यातील पेठवडज येथील निजामकालीन बांधकाम असलेल्या शाळेची इमारत मोडकळीस आली आहे. या इमारतीला बांधकामासाठी राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शेष निधीतून दहा टक्के निधी देण्यात यावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे. पण ही मागणी मान्य होत नसल्याने आज सोमवार दि. 4 मार्च रोजी गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर चक्क झोपा आंदोलन करून जिल्हा परिषदेचा निषेध व्यक्त केला.
पेठवडज येथील जिल्हा परिषदेची शाळा निजामकालीन बांधकाम केलेली असल्याने ती मोडकळीस आली आहे. या शाळेला नवरूप देण्यासाठी राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अंतर्गत महाराष्ट्र सरकारने एक कोटी 71 लाख रुपये मंजूर केले. त्यापैकी ८० टक्के रक्कम जिल्हा परिषदेच्या खात्यात जमा करण्यात आले. परंतु आलेला निधी देण्यास शिक्षण विभाग टाळाटाळ करत असल्याने अखेर गावकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. गावकरी लोकसहभागातून 15 व्या वित्त आयोगाची रक्कम भरण्यास तयार असून जिल्हा परिषदेच्या शेष निधीतून दहा टक्के निधी द्यावा अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
सोमवारी दिनांक चार मार्च रोजी नारायण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर झोपा आंदोलन करून निषेध व्यक्त केला आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻