ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींचे अधिकार संपुष्टात
नांदेड– जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ दि. २० मार्च रोजी संपला असून जिल्हा परिषदेच्या प्रशासकपदी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्यांचा कार्यकाळ रविवारी दि. २० मार्च रोजी संपला आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्याने लवकरच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता नाही. त्यामुळे मुदत संपलेल्या राज्यभरातील जि.प. व पंचायत समित्यांवर प्रशासकाची नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासकपदी सिईओ वर्षा ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली. आता मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेची सर्व सुत्रे प्रशासनाकडे आली आहेत. सोमवारी दि. २१ मार्च रोजी सकाळी वर्षा ठाकूर यांनी जि.प. सर्व खाते प्रमुखांची बैठक घेवून सुचना केल्या आहेत. जिल्हा परिषदेची पंचवार्षिक मुदत संपली असून, निवडणुका न झाल्याने आता जिल्हा परिषदेवर पदाधिकाऱ्यांची सत्ता, अधिकार संपुष्टात आले आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांच्या सभापतींना त्यांची दालने, वाहने आणि निवासस्थाने साेडावी लागणार आहेत. रविवारी या पदाधिकाऱ्यांचे पदासाेबत मिळालेले कायदेशीर अधिकार संपुष्टात आले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻