ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या अधिपरिचारिकेला ‘जीवनसाथी’ वेबसाईटवर प्रोफाइल तयार करून लग्नाचे आमिष दाखवून सव्वाचार लाख रुपयांना फसविण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २१ फेब्रुवारी २०२१ ते १४ जानेवारी २०२२ च्या दरम्यान घडला आहे.
विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या अधिपरीचारिका 29 वर्षीय महिलेला ‘जीवनसाथी’ वेबसाईटवरून प्रोफाइल तयार करून त्यांचे लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. दि. २१ फेब्रुवारी २०२१ पासून ते १४ जानेवारी २०२२ पर्यंत त्यांने विश्वासात घेऊन त्यांना लग्नाचे आमिष दाखविले. आणि नंतर त्यांच्याकडून चार लाख १२ हजार ५०० रुपये काढून घेतले.
वर्ष झाले तरीही ‘जीवनसाथी’ मिळत नसल्याने अखेर आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. संपूर्ण प्रकार त्यांनी पोलिसांना सांगितला. त्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ‘जीवनसाथी’ वेबसाईट प्रोफाईल तयार करणाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻