Friday, November 22, 2024

ट्रकला भीषण आग; एकाचा जळून मृत्यू, मृतदेहाचा अक्षरशः कोळसा झाला

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

संबंधित व्हिडिओ

नवीन नांदेड- नांदेड उस्माननगर रोडवरील शाहुनगर पाटीजवळ ट्रकला लागलेल्या आगीत एक जण जळुन खाक झाल्याची घटना दि.२६ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. आगीत मृत्यू झालेल्या इसमाच्या मृतदेहाचा अक्षरशः कोळसा झाला आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील नांदेड उस्माननगर रोडवरील बिजली हनुमान मंदिर देवस्थान समोरील पॉवर स्टेशनलगत असलेल्या रोडवर एका ट्रकला भीषण आग लागली. नांदेडकडुन उस्माननरकडे जात असलेल्या रोडवर मध्यरात्री ११.३० वाजता तांदुळ भरून असलेला ट्रक एम.एच.४० बि.जे ९६०४ हा वरील ठिकाणी आला असता ट्रकच्या कॅबिनने अचानक पेट घेतला व आगीने रौद्ररूप धारण केले. यात एक जण आतच अडकल्याने त्याचा जळुन मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव नितीन सटवाजी कांबळे (रा.हळदा) असे आहे.

आगीचा एकदमच भडका उडाल्याने ट्रकचे टायरही जळुन खाक झाले व मोठा स्फोट झाला असल्याचे सांगण्यात येते. या घटनेत ट्रक मधील ताडपत्री व तांदूळ जळाला आहे. घटनास्थळाच्या बाजूला काही अंतरावरच महावितरणचे मोठे सब स्टेशन असुन आग लवकर आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला आहे. घटनास्थळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे  कर्मचारी यांनी तात्काळ अग्नीशामक दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणली. ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बुकतरे, अंमलदार जे.एस.जावेद, डी.एल.गव्हाणकर यांनी घटनास्थळी पंचनामा करून सकाळी सातच्या सुमारास मृतदेह मयताचा भाऊ व नातेवाईक यांच्यासमक्ष काढून शवविच्छेदनसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

घटनास्थळी सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या आगीच्या घटनेबद्दल विविध शंका निर्माण होत असून तर्कवितर्क काढण्यात येत आहेत. आग नेमकी कशामुळे लागली, आग लागल्याचे लक्षात कसे आले नाही, ट्रकमधील तांदुळ कोणता आहे? असे प्रश्न निर्माण होत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!