Friday, November 22, 2024

ट्रक पेटला, नांदेड शहरात रात्री चार ठिकाणी आगीच्या घटना; सुदैवाने जीवित हानी टळली

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहर व परिसरात मध्यरात्रीच्या दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या आगीमध्ये ट्रक, कडबा आणि महावितरणचा डीपी जळून खाक झाला. यात मोठे नुकसान झाले असून सुदैवानं जीवित हानी टळल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.

नांदेड शहराच्या देगलूर नाका परिसरात बरकत कॉम्प्लेक्स येथील असलेल्या डीपीला आग लागली. ही आग आटोक्यात आणल्यानंतर लगेच अग्निशमन दलाला उस्माननगर रस्त्यावर वडगाव- किवळा दरम्यान कडब्याच्या गंजीला आग लागल्याची माहिती समजली. त्यांनी तात्काळ आपल्या वाहनासह त्याठिकाणी जाऊन मारोती रामजी कल्याणकर यांच्या जवळपास पाच कडब्याच्या गंजीला लागलेली आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर देगलूर रोड धनेगाव येथील शेख तयब व अब्दुल अज्जु हमीद यांच्या भंगाराच्या गोदामाला आग लागली. विशेष म्हणजे या आगीशेजारी घर असून बाजूलाच फ्रीजचे गोदाम होते. तसेच बेकरीचे दुकान आहे. ही आग लवकर आटोक्यात आली नसती तर मोठा अनर्थ घडला असता. अग्निशमन दलाने या आगीवरही नियंत्रण मिळविले.

त्यानंतर चौथ्या घटनेत बाफना टी पॉइंट येथे मंजीतसिंग यांच्या ट्रकला आग लागली. ट्रक क्रमांक (एमएच 26 एडी-0478) जळून खाक झाला. या सर्व आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अर्धापूर येथील नगर परिषद आणि नांदेड महापालिका अग्निशामक दलाने परिश्रम घेतले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!