ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
माहूर (जि. नांदेड)– माहूर शहरात विनापरवाना बेकायदेशीर डीजे लावून सोनापीर बाबा दर्गा उरूस मिरवणूक (संदल) काढून ध्वनिप्रदूषण केले तसेच जिल्हाधिकार्यांचा आदेश धुडकावून शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुमारे सत्तर जणांविरुद्ध माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहूर शहरात दि. 5 मार्च रोजी सायंकाळी चार ते रात्री नऊच्या सुमारास सोनापीर बाबा दर्गा उरूसच्या अनुषंगाने मिरवणूक काढली. मिरवणुकीत डीजे लावून ध्वनी प्रदूषण केले. मिरवणुकीला पोलिसांची परवानगी नसताना तसेच जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेश लागू असताना आदेशाचे उल्लंघन केले. याप्रकरणी माहूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार प्रकाश देशमुख यांच्या फिर्यादीवरून बेकायदेशीररित्या संदल मिरवणूक काढणाऱ्यांविरुद्ध शासकीय आदेशाचे उल्लंघन, कोरोना नियमावलीची पायमल्ली, राष्ट्रीय आपत्ती कायदा व ध्वनिप्रदूषण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.
यांच्यावर झाले गुन्हे दाखल
शेख नजीर शेख वजीर, शेख एजाज शेख इस्तेकार, शेख मुसबीर शेख इमाम, शेख अमजद शेख अजीज, शेख साजिद शेख माजिद, सय्यद मिराज सय्यद गफूर, शाहरुख खान खैरुल्लाखान, सैफ अलीखान खान, वाजीदखान नूरखान, शेख मुजाहिद शेख माजीद, शेख शहारुख शेख अब्दुल, शेख अजीज शेख हमीद आणि विशाल विजय खरे सर्व राहणार माहूर यांच्यासह इतर 70 जणांचा समावेश आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻