ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- धर्माबाद येथील जवळपास आठ व्यापाऱ्यांकडून हरभरा खरेदी करून 83 लाख 14 हजार 556 रुपयांची फसवणूक करणाऱ्या निजामाबाद येथील आरोपींविरुद्ध धर्माबाद पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धर्माबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये शिक्षक कॉलनी धर्माबाद येथे राहणारे व्यापारी कंदूरके नागनाथ विठ्ठलराव यांचे दुकान आहे. त्यांनी शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी करून निजामाबाद येथील मोहम्मद आरिफोदिन मोहंमद नसीरुद्दीन आणि त्याचा सहकारी धर्माबाद येथील मोहम्मद रफी मोहम्मद बशीर या दोघांना विक्री केला. कंदूरके यांनी जवळपास पंधरा लाख 45 हजार 827 रुपयांचा हरभरा तर त्यांच्या इतर व्यापाऱ्यांनी 67 लाख 64 हजार 760 रुपयांचा हरभरा मोहम्मद आणि मोहम्मद रफी यादव यांना विकला. या हरभऱ्याची किंमत 83 लाख 14 हजार 556 रुपये आहे. ही रक्कम या दोन्ही आरोपींनी धर्माबाद येथील व्यापाऱ्यांना परत केली नाही आणि मालही दिला नाही. हा प्रकार 15 फेब्रुवारी 2020 ते 3 डिसेंबर 2021 या दरम्यान घडला होता. पैसे परत मिळतील या आशेवर या सर्व व्यापाऱ्यांनी निजामबादच्या भरपूर चकरा केल्या, परंतु त्यांच्या हाती काही लागत नसल्याने अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी 10 मे रोजी धर्माबाद येथे येऊन पोलिसांत रितसर फिर्याद दिली.
कंदूरके नागनाथ विठ्ठलराव यांच्या फिर्यादीवरून धर्माबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांनी मोहम्मद आरिफ आणि मोहम्मद रफी यांच्याविरुद्ध संगनमताने फसवणूक व विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पंतोजी करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻