Friday, November 22, 2024

दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर उत्साहाला उधाण; महामानवाला अभिवादन करण्यासाठी नांदेडमध्ये उसळला जनसागर

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ मिरवणुकीत विविध देखावे, लेझीम पथक, कसरती

नांदेड (प्रल्हाद कांबळे)- निळ्या सैनिकांची ही निळी सलामी…. कसा  शोभला असता भीम माझा, टाय अन कोटावर… काळजावर माझ्या कोरलेले नाव…. असे एकापेक्षा एक प्रसिद्ध भीम गीतांवर हजारो भीम सैनिक थिरकले… दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधांच्या काळानंतर यावर्षी पूर्ण उत्साहाने होत असलेल्या जयंतीच्या निमित्ताने उत्साहाला उधाण आल्याचे दिसून येत आहे.

नांदेड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी मिरवणुकीत मोठा जनसागर उसळला आहे. सायंकाळी सुरु झालेल्या मिरवणूका रात्री उशिरापर्यंत सुरूच आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात निळ्या कमानी उभारण्यात आला असून सर्वत्र निळे झेंडे फडकत आहेत. ढोल- बाजा, डीजे आणि फटाक्यांची आतिषबाजी असे उत्साहाचे वातावरण सगळीकडे आहे.

रेल्वे स्थानकाशेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आज  दि. १४ एप्रिल रोजी पहाटेपासूनच अभिवादन करण्यासाठी गर्दी सुरू झाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शहरातील मुख्य रस्ते भीमसैनिकांच्या मोठ्या समुदायाने खचाखच भरले होते. ढोल आणि डीजेच्या तालावर तरुणाई थिरकत होती. विविध मिरवणूकीत कसरती खेळ, दांडपट्टा, लेझीम आदी देखाव्यांसहित या मिरवणुका सायंकाळच्या सुमारास निघाल्या. शहराच्या विविध वस्त्यांमधून हजारोंच्या जनसमुदाय या मिरवणुका सहभागी झाला होता. या मिरवणुकांमध्ये महिला, लहान बालके, आबालवृद्धांसह मोठा भीम अनुयायी समुदाय सहभागी झाला होता. मिरवणुकीत सहभागी झालेल्या आंबेडकरी जनतेला जागोजागी सामाजिक संघटनांच्यावतीने थंडपेय, थंड पाणी तसेच अन्नदान करण्यात आले. काही जयंती मंडळांनी ठिकठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. शहराच्या मिरवणूक जाणाऱ्या रस्त्यावर व अंतर्गत रस्त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रांचे मोठ- मोठे होर्डिंग्ज लावण्यात आलेले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विविध संघटना, राजकीय पक्ष, प्रशासनाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले. यात खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहनराव हंबर्डे, महापौर जयश्री पावडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे, अशोक उमरेकर, रमेश पाटील कोकाटे, सखाराम तुपेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. सुनील कदम, गणेश तादलापुरकर, माधव चिंचाळे, रऊफ इनामदार, कल्पनाताई डोंगळीकर, भाजपचे प्रवीण साले, दिलीप कंदकुर्ते, दीपकसिंह रावत, अभिषेक सौदे, दिलीपसिंग सोडी, ऍड. दिलीप ठाकूर, आंबेडकरी चळवळीचे सुरेश गायकवाड, दत्ताहरी धोत्रे, रमेश सोनाळे, बापूराव गजभारे, प्रशांत इंगोले, सुखदेव चिखलीकर, मनसेचे मॉन्टीसिंग जाहगीरदार, उषा नरवाडे, सुभाष भंडारे, दीपक स्वामी, उमा सूर्यवंशी, संतोष सुनेवाड, श्याम कांबळे, प्रितम जोंधळे, राहुल प्रधान, सदाशिव पुरी, चक्रधर कोकाटे, सुरेश हटकर, भि. ना. गायकवाड, सत्यपाल सावंत यांच्यासह जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. विपीन, पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, आयुक्त डॉ सुनील लहाने, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख, डॉ. सिद्धेश्वर भोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार, भगवान धबडगे, डॉ. नितीन काशीकर, अनिरुद्ध काकडे, सुधाकर आडे, अशोक घोरबांड यांनीही महामानवास अभिवादन केले. मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!