ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड/ धर्माबाद– धर्माबाद रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर दोनच्या बाजूला उमरी येथील एक महिला थांबली होती. ती एकटीच असल्याची संधी साधून धर्माबाद येथील दोन आरोपीने तिच्या जवळ जाऊन जबरीने तिच्या जवळील 75 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण जबरीने चोरून घेतले. एवढेच नाही तर तिच्यावर या दोघांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ही घटना दि. 21 जानेवारीच्या पहाटेच्या सुमारास घडली. त्यानंतर सकाळी पीडित महिला नांदेड लोहमार्ग पोलिस ठाण्यात हजर झाली. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तात्काळ तपास यंत्रणा हलवत धर्माबाद येथील दोन्ही आरोपींना अटक केली. धर्माबाद घटनास्थळाला लोहमार्ग पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी भेट दिली असून दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती बोइने ह्या औरंगाबाद येथे गेल्या आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻