ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- भोकरच्या एका डॉक्टर महिलेने शहरातील रेल्वे स्थानकासमोर असणाऱ्या पंजाब लॉजमध्ये आत्महत्या केल्याचा प्रकार आज दि. 24 मार्चच्या सायंकाळी उघडकीस आला. याबाबत वजिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार डॉ. विद्या अमोल सुंकवाड (वय 33) या महिला डॉक्टरने मंगळवार दि. 22 मार्च रोजी रेल्वे स्थानकासमोरील पंजाब लॉजमध्ये एक खोली घेतली. दि. 23 मार्च रोजी सकाळी त्या उठून बाहेर गेल्या आणि पुन्हा आपल्या खोलीत परत आल्या. गुरुवार दि. 24 मार्च रोजी सकाळी त्या बाहेर आल्याच नाही आणि आपल्या रुमचे दारही उघडले नाही. यामुळे लॉजच्या व्यवस्थापनाने दार वाजविले, पण प्रतिसाद मिळाला नाही. कांही वेळानंतर पुन्हा एकदा लॉज व्यवस्थापनाने प्रयत्न केला, परंतू प्रतिसाद मिळाला नाही. तेंव्हा पंजाब लॉज व्यवस्थापनाने वजिराबाद पोलिसांना याबाबत माहिती दिली.
या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार त्यांचे सहकारी अधिकारी, पोलीस अंमलदार घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी दार तोडून तेव्हा आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. तेथे दिसणाऱ्या परिस्थितीनुसार डॉ. विद्या सुंकवाडकडे एक बॅग होती. त्यात नवीन नॉयलॉन दोरी होती. अनेक प्रकारच्या औषधी गोळ्या आहेत. तसेच त्यांच्या शरिरावरील कटरने जखमा झालेल्या दिसत आहेत. गळ्याची, हाताची नस कापलेली आढळून आली आहे. कटर मयत डॉक्टरच्या हातातच आहे. अशा या परिस्थितीत हा मृतदेह सापडला आहे.
डॉ. विद्या यांचे पती भोकर येथे डॉक्टर आहेत. डॉक्टर पती- पत्नी भोकर येथेच राहतात. त्यांना पाच ते सहा वर्षाचा मुलगा आहे. डॉ. विद्याची आई, आजोबा आणि भाऊ नांदेड शहरातील फरांदेनगर भागात राहतात. या घटनेने नांदेड शहरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी सांगितले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻